Trump_Nikky Haley 
ग्लोबल

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या निक्की हॅलेंना झटका; न्यू हँपशर प्रायमरीत ट्रम्प यांचा विजय

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये यामुळं ट्रम्प यांना मोठी आघाडी मिळू शकते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यू हँपशरच्या प्राथमिक निवडणुकीत (GOP Primary) मोठा विजय मिळाला आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून ट्रम्प यांनी आपला प्रतिस्पर्धी भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हॅले यांच्यापेक्षा खूपच पुढे निघून गेले आहेत. यामुळं हॅले यांना मोठा झटका मानला जात आहे. (USA Elections 2024 Donald Trump likley to win in New Hampshire GOP Primary aginst Nikki Haley)

डिसिजन डेस्कच्या मुख्यालयाच्या हवाल्यानं आलेल्या आय दि हिलच्या वृत्तानुसार, जेव्हा न्यू हँपशरमध्ये मतमोजणी सुरु झाली. सुरुवातीच्या कलांमध्येच ट्रम्प यांनी मोठी बढत घेतली होती. याच आधारे न्यू हँपशल जीओपी प्रायमरी जिंकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे

अमेरिकन मीडिया काय म्हणतो?

एकूण मतदानापैकी २६ टक्के मतांच्या मोजणीनंतर ट्रम्प यांच्या खात्यात ५३.८ टक्के मत पडली. याचवेळी निक्की हॅले यांना केवळ ४५.५ टक्के मतं मिळाली. सीएनएनच्यानुसार, १५ टक्के मतांच्या मोजणीनंतर ट्रम्प ५३.१ टक्के मत मिळाली. तर ११ डेलिगेट्ससोबत ट्रम्प हे निक्की हॅले यांच्या पुढेही आहेत. हॅले यांच्याकडं केवळ ४५.५ टक्के आणि ८ डेलिगेट्सची लीड आहे. या आकडेवारीनुसार आता केवळ ट्रम्प यांच्या विजयाची औपचारिक घोषणाच बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kokilaben Ambani Hospitalised : कोकिळाबेन अंबानी यांची अचानक तब्येत बिघडली, एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल

Maharashtra Latest News Live Update : गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर

Solapur Bailpola:'अकोलेकाटीत वीस वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या दारात होती बैलजोडी'; आज बोटावर मोजण्याइतक्याच; ट्रॅक्टरने बळकावली बैलांची जागा

South America Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने दक्षिण अमेरिका हादरली ! 8.0 इतकी तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nations Cup 2025: नेशन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर सुरू; सहा दिवसांनंतरही ३५ पैकी २५ खेळाडूंचीच उपस्थिती

SCROLL FOR NEXT