ग्लोबल

USA Indian Student dead: पर्ड्यू विद्यापीठातील 'त्या' बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; आठवड्यात दुसरी घटना

या विद्यार्थ्याच्या आईनं आमचा मुलगा बेपत्ता झाला असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

इंडियाना : अमेरिकेतल्या इंडियाना भागातल्या पर्ड्यू विद्यापीठात शिकत असलेला एक भारतीय विद्यार्थी नील आचार्य हा रविवारपासून बेपत्ता झाला होता. पण आता त्याचा मृत्यू झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. टिपेकॅनो काउंटी कॉरोनरनं या वृत्ताची पुष्टी केली आहे. (USA Missing Indian student of Purdue University confirmed dead)

Tippecanoe काउंटी कोरोनर कार्यालयानुसार, अधिकाऱ्यांना रविवारी सकाळी 11:30 च्या सुमारास शोध घेत असताना त्यांना 500 ऍलिसन रोड वेस्ट लाफायेटच्या पर्ड्यूच्या कॅम्पसमध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह आढळून आला. (Latest Marathi News)

नील आचार्य असं मृत विद्यार्थ्याचं नाव असल्याचं अधिकाऱ्यांनी कन्फर्म केलं आहे. पर्ड्यू एक्सपोनंट जी विद्यापीठाची स्वतंत्र मल्टीमीडिया एजन्सी आहे याच्या माहितीनुसार, सोमवारी विद्यापीठाच्या संगणक विज्ञान विभागाला लिहिलेल्या ईमेलमध्ये प्रमुख पदाधिकारी ख्रिस क्लिफ्टन यांनी नील आचार्यच्या मृत्यूची माहिती विद्यार्थी आणि प्राध्यापकांना दिली.

दरम्यान, रविवारी मृत नील आचार्य याच्या आईनं गौरी आचार्य यांनी ट्विटरवर एका पोस्ट लिहित आवाहन केलं होतं की, "आमचा मुलगा नील आचार्य काल 28 जानेवारी (12:30 AM EST) पासून बेपत्ता आहे. तो अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिकत होता. उबेर ड्रायव्हरनं त्याला शेवटचं पाहिलं तेव्हा त्यानं त्याला पर्ड्यू विद्यापीठात सोडलं होतं. आम्ही त्याचा शोध घेत आहोत, तुम्हाला काही माहिती असल्यास कृपया आम्हाला मदत करा" (Marathi Tajya Batmya)

या ट्विटला उत्तर देताना शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासानं म्हटलं की, "वाणिज्य दूतावास पर्ड्यू विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि नीलच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. वाणिज्य दूतावास सर्व शक्य सहकार्य आणि मदत करेल" (Latest Maharashtra News)

या आठवड्याच्या सुरुवातीला, अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतातील लिथोनिया इथं एका दुकानात एका माणसानं हातोड्यानं वार करून एका भारतीय विद्यार्थ्याचा निर्घृणपणे खून केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, परंतू ही घटना नेमकी कधी घडली होती हे स्पष्ट झालं नव्हतं.

विवेक सैनी नामक या भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला करताना दिसणारा माणूस बेघर आहे. या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका व्यक्तीने एएनआयला सांगितले की, पोलिस अधिकाऱ्यांनी दृश्य पुराव्यांनुसार तातडीने अटक केली आहे. या तरुणाचं पार्थिव 24 जानेवारी रोजी भारतात त्याच्या कुटुंबाकडं सुपूर्द करण्यात आलं, असं त्या व्यक्तीने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT