Hunter Biden 
ग्लोबल

Hunter Biden: आयकर भरला नसल्यानं बायडन यांच्या मुलाला होणार शिक्षा! नेमकं काय घडलंय वाचा?

यामुळं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांना झटका बसला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर यांना कर चुकवेगिरी केल्यासह दोन गुन्ह्यांसाठी स्थानिक कोर्टानं दोषी ठरवलं आहे. त्यामुळं आता हंटर बायडन यांना शिक्षा होणार आहे. आपण ड्रग्जसह बेकायदेशीरपणे बंदूक बाळगल्याचंही त्यांनी कबूल केलं आहे. (USA Presidents Son Hunter Biden Pleads Guilty To Tax Offenses)

हंटर बायडन यांचे व्यावसायिक व्यवहार अनेक वर्षांपासून रिपब्लिकन खासदारांकडून पाहिले जातात. तसेच आपल्याजवर ड्रग्ज असल्याचं तसेच आपण बेकायदा बंदुक जवळ बाळगल्याची कबुली हंटर यांनी दिली आहे. पण या गुन्ह्यांमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या मुलाला तुरुंगवास भोगावा लागण्याची शक्यता नाही, असंही सांगितलं जात आहे. (Latest Marathi News)

याप्रकरणी व्हाईट हाऊसचे प्रवक्ते इयान सॅम्स म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीचं आपल्या मुलावर प्रेम असून त्यांचं जीवन पुन्हा रुळावर यावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत, त्यामुळं आम्ही यावर यापुढं टिप्पणी करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

आरोपांनुसार, हंटर बायडनं हे सन 2017 आणि 2018 मध्ये 1.5 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त कमाईवरील कर वेळेवर भरलेला नाही. दोन्ही वर्षांमध्ये त्यांची कमाईवरील 1,00,000 डॉलरपेक्षा जास्त कर देणं बाकी आहे. त्यांच्या या प्रत्येक कर चुकवेगिरीसाठी त्यांना 12 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 1,00,000 डॉलरपर्यंत दंड किंवा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी जे काही मिळवलं त्याच्या दुप्पट दंड ठोठावला जाऊ शकतो.

दरम्यान, वेस म्हणाले की, हंटर बायडन यांना ड्रग्जचं सेवन आणि बेकायदा बंदुक बाळगण्याचा देखील आरोप आहे. आपण पूर्वी ड्रग्ज घेतल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. पण यामध्ये त्यांच्यावर बंदुकीच्या आरोपावर कारवाई केली जाणार नाही. मध्ये सहसा समुपदेशन किंवा पुनर्वसन करण्याचा सल्ला दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT