Depression-in-six-months 
ग्लोबल

सोशल मीडियाच्या अतिवापराने सहा महिन्यात डिप्रेशन; अमेरिकेतील आर्कान्सा विद्यापीठाचे संशोधन

पीटीआय

वॉशिंग्टन - जगभरात सोशल मीडियाचा वापर सातत्याने वाढत असून त्याच्या अतिवापराने तरुणांमध्ये अवघ्या सहा महिन्यांतच नैराश्य (डिप्रेशन) येऊ शकते, असा दावा एका नव्या संशोधनात केला आहे. अमेरिकेतील आर्कान्सा विद्यापीठातील सार्वजनिक आरोग्याचे प्रा.ब्रायन प्रायमॅक यांनी हे संशोधन केले आहे. आज ऑनलाईन प्रकाशित झालेले हे संशोधन फेब्रुवारीत ‘प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन’ या नियतकालिकातप्रसिध्द होईल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दररोज १२० मिनिटांपेक्षा कमी काळ सोशल मीडिया वापरणाऱ्या सहभागींची त्याचा ३०० मिनिटे वापर करणाऱ्यांशी तुलना करण्यात आली. त्यावेळी, दररोज ३०० मिनिटांहून अधिक वेळ सोशल मीडियावर घालणाऱ्या तरुणांना सहा महिन्यातच नैराश्य गाठू शकते, असे आढळले. सोशल मीडियामुळे नैराश्याचा आजार जडत असल्याचे यापूर्वीच्या संशोधनातूनही समोर आले आहे. मात्र, अमेरिकेत त्याचा कालावधी मोजणारे संशोधन प्रथमच करण्यात आले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पिट्‌सबर्ग विद्यापीठाचे सहाय्यक प्रा.सीझर एस्कोबार-व्हियरा यांच्या मते, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे इतर व्यक्तींबरोबरचे अंतर्गत नातेसंबंध तयार होण्यात अडथळा येऊ शकतो. त्याचप्रमाणे, वैयक्तिक किंवा व्यावसायिक उद्दिष्टे गाठण्यातही अपयश येऊ शकते. कोरोना साथीच्या काळात हे संशोधन महत्वपूर्ण ठरू शकते. इतर सर्व मानसिक विकारांपेक्षा नैराश्याचा विकार व्यक्तीला अधिक असमर्थ करतो. जागतिक आरोग्य संघटनेनेही नुकतेच नैराश्य असमर्थततेचे प्रमुख जागतिक कारण असल्याचे जाहीर केले आहे. 

कसे केले संशोधन? 
संशोधकांनी अमेरिकेतील १८ ते ३० या वयोगटातील एक हजार व्यक्तींचा सोशल मीडिया वापर तपासला. त्यासाठी विशिष्ट प्रश्नावली वापरून त्यांचा फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी विविध ते प्लॅटफॉर्मवर किती वेळ घालवतात, हे तपासले. त्याचप्रमाणे, त्यांचे वय, लिंग, वंश, शिक्षण, उत्पन्न, रोजगार आदी गोष्टींचेही विश्लेषण केले. 

यापूर्वीच्या अनेक संशोधनातून सोशल मीडिया व नैराश्याच्या सहसंबंध उघड झाला आहे. मात्र, सोशल मीडिया आधी की नैराश्य हा प्रश्न कोंबडी व अंडयासारखाच कठीण आहे. मात्र, आमच्या संशोधनाने यावर प्रकाशझोत टाकला असून सोशल मीडियाच्या अतिवापराने सहा महिन्यात नैराश्य येऊ शकते. 
-प्रा.ब्रायन प्रायमॅक, आर्कान्सा विद्यापीठ, अमेरिका 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT