un.j 
ग्लोबल

जगाला लस पुरवण्याची भारताकडे क्षमता; संयुक्त राष्ट्र प्रमुखांची स्तुतीसुमने

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारत जगातील दुसरा सर्वात मोठा लोकसंख्येचा देश असून सुद्धा जगभरातील अनेक देशांना कोरोना लशीचा पुरवठा करत आहे. भारतातही लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे, असे असताना भारत शेजारधर्माचेही पालन करत आहे. भारताच्या याच उदारपणामुळे अनेक देश कौतुक करत आहेत. संयुक्त राष्ट्राचे महासचिव ऐंतोनियो गुतेरस यांनीही भारतावर स्तुती सुमने उधळली आहेत. एनएनआय या वृत्त संस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

मीडियाशी बोलताना संयुक्त राष्ट्र प्रमुख म्हणाले की, मला माहिती आहे की भारतात मोठ्या प्रमाणात स्वदेशी कोरोना लशीची निर्मिती केली जात आहे. आम्ही यासाठी भारताच्या संपर्कात आहोत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, भारत जगभरातील लसीकरण मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. मला वाटतं की कोरोना लस निर्माण करण्याची क्षमता भारताकडे जगात सर्वाधिक आहे. भारत मोठ्या प्रमाणात लस तयार करत आहे. भारत संपूर्ण जगाला मदत करेल असा विश्वास आहे. 

भारताने आतापर्यंत 55 लाख लशीचे डोस शेजारी देशांना गिफ्ट म्हणून दिले आहेत. असे असताना संयुक्त राष्ट्र प्रमुखांचे वक्तव्य आलं आहे. आठवड्याच्या बैठकीदरम्यान गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं की, भारत आता ओमान, CARICOM देश, निकारगुआ, पॅसिफिक आयलँड स्टेट्स यांनाही कोरोनाची लस गिफ्ट म्हणून देण्याची योजना बनवत आहे. भारताने सांगितलं की, आफ्रिकी देशांना 1 कोटी आणि संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना 10 लाख कोरोना लस देण्यात येणार आहेत. 

दरम्यान, देशात कोरोना लसीकरण सुरु झालं आहे. आतापर्यंत देशात जवळपास 20 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड-19 लस देण्यात आली आहे. भारत सरकारने सीरम इन्स्टिट्यूटची कोनिशिल्ड आणि स्वदेशी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. सध्या प्रामुख्याने देशात कोवॅक्सिन लशीचा डोस दिला जात आहे. पहिल्या टप्प्यात देशातील 3 कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लशीचा डोस देण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT