लस Media Gallery
ग्लोबल

भारतीय व्हेरियंटवर एक डोस परिणामकारक नाही - UK

नामदेव कुंभार

भारतात आढळलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) नवीन व्हेरियंटवर लसीचा एक डोस परिणामकारक नाही. यासाठी लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असल्याचं इंग्लंड सरकारच्या रिसर्च समितीने केलेल्या सखोल अभ्यासात समोर आलं आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याने B.1.617.2 व्हेरियंटवर 81 टक्के, तर इंग्लंडमध्ये आढळेल्या B.1.1.7 व्हेरियंटवर 87 टक्के प्रभावी असल्याचं पब्लिक हेल्थ इंग्लंडने जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. भारतात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर ऑक्सफोर्डच्या (Oxford/AstraZeneca Vaccine) लसीचे दोन डोस परिणामकारक असल्याचं इंग्लंडच्या पब्लिक हेल्थ (PHE)विभागाला दिसून आलं आहे.

फायनांशियल टाइम्समध्ये आलेल्या वृत्तानुसार, ऑक्सफोर्डच्या लसीच्या दोन्ही डोसवर संशोधन करण्यात आलं. यामध्ये एक डोस घेतल्यानंतर केलेल्या अभ्यासात B.1.617.2 व्हेरियंटवर 33 टक्के, तर B.1.1.7 व्हेरियंटवर 51 टक्के इतकाच प्रभाव दिसून आला आहे. त्यामुळे ऑक्सफोर्ड लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असल्याचं इंग्लंड सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

PHE ने बायोएनटेक/फाइजर आणि ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेका (Oxford/AstraZeneca vaccine) लसीच्या डोसवर संशोधन केलं. यामध्ये त्यांना असं आढळून आलं की, ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेका लसीचे दोन डोस 85 ते 90 टक्के प्रभावी आहेत. या लसीचा एक डोस तितका प्रभावी नाही.

भारतात 16 जानेवारी रोजी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सर्वात आधी कोरोना योद्धा, फ्रंटलाईन कोरोना वर्कर यांना लस देण्यात आली. त्यानंतर 45 वयोगटावरील आणि आता 18 वयोगटावरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. जगात सर्वात जास्त लस निर्मिती करणाऱ्या भारतात सध्या लसीचा तुटवडा आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत 43.05 मिलियन नागरिकांनी म्हणजे, फक्त तीन टक्के भारतीयांनी लसीचे दोन डोस घेतले आहे. 151.90 मिलियन नागरिकांनी लसीचा एक डोस घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT