New York City rain 
ग्लोबल

New York City: न्यूयॉर्क राज्यात मुसळधार पावसानं आणीबाणीची स्थिती; रेल्वे, विमान सेवा ठप्प

कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- न्यूयॉर्क राज्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय हवामान विभागाने सकाळी काही भागात २ इंचापेक्षा (५.०८ सेमी) जास्त पावसाची नोंद केली आहे. तसेच पुढील काही तासांत आणखी २ इंचाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.

शहरात सर्वत्र पाणी पसरले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसेच रस्ते आणि फूटपाथ पाण्याखाली बुडाले आहेत.

मुसळधार पावसाचा विमान प्रवासावरही परिणाम झालाय. माहितीनुसार, LaGuardia विमानतळाचे एक टर्मिनल बंद करण्यात आले आहे.

रेल्वे प्रवासावर निर्बंध आले असून प्रशासनाकडून आवश्यक तेव्हाच प्रवास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

न्यूयॉर्क शहराच्या राज्यपाल केथी होचूल यांनी नागरिकांना आव्हान केलंय की हवामान विभागाचे अपडेट पाहूनच घराच्या बाहेर पडा. तसेच त्यानुसारच आपले कार्यक्रम आयोजित करा.

न्यूयॉर्क राज्याला पावसाने अक्षरश: झोडपले आहे. न्यूयॉर्क, न्यूजर्सी, पेन्सेलवानीया, कनेक्टिकट या शहरात मोठ्या पावसाची नोंद झालीये. मॅनहॅटन, ब्रुकलिन, क्विन, द ब्रोन्क्स, स्टेटन आयलँड आणि लाँग आयलँड या शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

माहितीनुसार, ब्रुकलिन सहा इंच पाण्यात बुडाले आहे तर सेंट्रल पार्कमध्ये ५ इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पावसाची तीव्रता वाढणार असल्याने नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेकजण पाण्यात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप कोणत्या जीवितहानीची नोंद झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT