joe biden main.jpg 
ग्लोबल

VIDEO: आधी अडखळले मग पुन्हा पडले, विमानाच्या पायऱ्या चढताना बायडन यांचा 3 वेळा घसरला पाय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते विमानाच्या पायऱ्या चढताना अंदाज चुकल्याने पडताना दिसले आहेत. या दुर्घटनेत त्यांना दुखापत झाली नाही, ही समाधानाची बाब आहे. नंतर त्यांनी स्वतःला सावरत विमानात प्रवेश केला. ही घटना शुक्रवारी घडली. बायडन हे अटलांटाला जाण्यासाठी विमानात प्रवेश करत होते, त्यावेळी हा प्रकार घडला. अटलांटा येथे ते आशियन-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत जो बायडन तीन वेळा एअर फोर्स विमानात प्रवेश करताना पायऱयांवर अडखळल्यामुळे पडताना दिसले. पायऱ्या चढताना त्यांचे संतुलन बिघडल्याने ते अडखळल्याचे व्हिडिओत दिसतात. त्यामुळे ते तीन वेळा पडले. दोन वेळा त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. हातावर जोर देऊन ते उठलेही. परंतु, तिसऱ्या वेळी मात्र त्यांना गुडघ्यावर जोर देऊन उठावे लागले. त्यावेळी त्यांनी स्वतःला व्यवस्थितपणे सावरले आणि एकट्याने पायऱ्या चढून सुरक्षितपणे विमानात प्रवेश केला. एअर फोर्स विमानाच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर त्यांनी सर्वांना हात उंचावत अभिवादनही केले. डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करणारे 78 वर्षीय बायडन हे अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत. 

या घटनेनंतर व्हाइट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी कॅरिन जिन पियरे यांनी बायडन यांची प्रकृती पूर्णपणे ठीक असून पायऱ्यांचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले आहे. पायऱ्या चढताना हवा मोठ्याप्रमाणात वाहत होती. त्यामुळे कदाचित बायडन यांचे संतुलन बिघडल्यामुळे ते अडखळले असतील, असेही ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Harry Brook Record: इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने रचला इतिहास, T20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार रोहित शर्मालाही हे जमलं नाही

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT