Japan
Japan 
ग्लोबल

ब्रिटिश कोविड-१९ मुळे जपानच्या प्रांतात दक्षता आदेश

यूएनआय

टोकियो - ब्रिटनमध्ये कोविड-१९चा नवा प्रकार आढळल्यामुळे अनेक देशांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यात जपानने शिझुओका प्रांतात दक्षता आदेश जारी केला.

जपानने ४७ पैकी ११ प्रांतांमध्ये यापूर्वीच आणीबाणी लागू केली आहे, जिचा कालावधी सात फेब्रुवारीपर्यंत आहे. ऱ्यूक्यू शिम्पो वृत्तपत्रानुसार दक्षिणेच्या टोकाला असलेल्या ओकिनावा प्रांतात तिसऱ्या पातळीची आणीबाणी लागू होईल. तेथे गेल्या वर्षी एप्रिलपासूनच आणीबाणीचे निर्बंध लागू आहेत.

अत्यवस्थ रुग्ण वाढले
जपानमध्ये अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची संख्या एक हजारपेक्षा जास्त झाली आहे. ही संख्या गेल्या १७ दिवसांत सलग वाढत होती. कोरोनाची जागतिक साथ सुरु झाल्यापासून हा आकडा सर्वाधिक आहे. तीन लाख ३१ हजार रुग्ण व चार हजार ३०५ मृत्यू अशी जपानमधील कोरोनाची आतापर्यंतची आकडेवारी आहे.

प्रवास केला नसूनही...
एनएचके या जपानच्या सार्वजनिक दूरचित्रवाणी वाहिनीच्या वृत्तानुसार ब्रिटनला प्रवास केला नसूनही तेथील विषाणूचा प्रकार शिझुओका येथील काही लोकांमध्ये आढळला. सोमवारी तीन व्यक्तींना हा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यांचा वयोगट २० ते ७० दरम्यान आहे. ते ब्रिटनला गेले नव्हे, पण तेथे गेलेल्या कुणाच्या संपर्कात आले होते का याविषयी माहिती घेतली जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचे प्रकार वाढतच चालले

  • अलीकडच्या काही आठवड्यांत कोविड-१९ विषाणूच्या उत्परिवर्तन झालेल्या अनेक नव्या प्रकारांची जगभरात नोंद
  • डिसेंबरच्या मध्यास इंग्लंडमध्ये नव्या विषाणूची नोंद
  • आग्नेय इंग्लंडमधील विषाणूच्या प्रकाराच्या संसर्गाची तीव्रता आधीच्या विषाणूच्या तुलनेत ७० टक्के जास्त
  • दक्षिण आफ्रिका, ब्राझील अशा देशांतही नव्या प्रकारांची नोंद
  • नवा प्रकार आढळलेल्या देशांमध्ये कोरोनाच्या लशीच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नचिन्ह

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT