vijay-mallya 
ग्लोबल

मल्ल्याला 'सर्वोच्च' दणका; भारताकडे प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा

वृत्तसंस्था

लंडन : बँकांचे नऊ हजार कोटी बुडवून पळालेल्या विजय मल्ल्याचा प्रत्यार्पणाविरोधातील याचिका ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे आता मल्ल्याचा अखेरचा मार्गही बंद झाला आहे. लंडनच्या उच्च न्यायालयाने नुकताच मल्ल्या विरोधात निकाल दिला होता. म्हणून मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

मल्याला येत्या 28 दिवसात भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. यावर प्रीती पटेल या ब्रिटनच्या गृह सचिव अंतिम निर्णय घेणार आहेत. यापूर्वीही ब्रिटनच्या तत्कालीन गृह सचिवांनी मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली होती. मात्र मल्ल्याने प्रत्यार्पणाविरोधात लंडन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती फेटाळून लावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मल्ल्याला मात्र दोन्ही न्यायालयांकडून दिलासा मिळालेला नाही. भारतीय यंत्रणांनी दिलेल्या यशस्वी लढ्याला अखेर यश मिळाले आहे.

सर्व कायदेशीर मार्ग बंद: 
ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याची प्रत्यार्पणाविरोधात याचिका फेटाळल्यानंतर  सर्व कायदेशीर मार्ग बंद झाले आहेत. ब्रिटनच्या गृह विभागाकडून प्रत्यार्पणासाठी भारत सरकारला लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विजय मल्ल्याचे ट्विट  
मल्ल्याने पुन्हा एकदा ट्विट करत भारत सरकारकडे खटला मागे घेण्याची विनंती केली आहे. आपण शंभर टक्के कर्ज फेडण्यास तयार असून माझ्यावरील सर्व खटले मागे घ्यावे अशी विनंती केली आहे. मल्ल्याने भारताच्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबद्दल सरकारचे अभिनंदनही केले असून मी अनेकदा कर्ज फेडण्याची तयारी दर्शविली आहे. कोरोनाच्या लढाईत
सरकार हवी तेवढी पैशांची छपाई करू शकते, मात्र मी देखील लहान योगदान देऊ इच्छित आहे. बँकांचे शंभर टक्के कर्ज द्यायला तयार आहे. केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT