myanmar 
ग्लोबल

म्यानमारमध्ये लष्कराने 11 गावकऱ्यांना जिवंत जाळले | Report

सकाळ डिजिटल टीम

म्यानमारमधील (myanmar) लष्कर (soldier) वारंवार मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे. निरपराध लोकांचा जीव घेतला जात आहे. रिपोर्टनुसार, यावेळी म्यानमारच्या लष्कराने गावकऱ्यांचा कहर केला आहे. म्यानमारच्या लष्कराकडून पाच मुलांसह 11 गावकऱ्यांना जिवंत जाळल्याची धक्कादायक माहिती सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

गावकऱ्यांना एकत्र केले, त्यांचे हात बांधले आणि पेटवून दिले

मंगळवारी म्यानमारच्या उत्तर-पश्चिम सागाइंग प्रदेशातील डॉन ताव गावात जळालेल्या मृतदेहांची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली. येथील पुरुषांना गोळ्या घालून जाळण्यात आल्यानंतर काही वेळातच व्हिडिओ फुटेज घेण्यात आले, तर व्हिडिओ बनवला जात असताना काही पीडित अजूनही जिवंत असल्याचे सांगण्यात येत आहे. 1 फेब्रुवारीच्या सत्तापालटापासून, या प्रदेशात लष्करी राजवटीच्या विरोधकांनी स्थापन केलेल्या जंटा फोर्स आणि मिलिशिया यांच्यात भीषण लढाई सुरू आहे. लष्कराने आधी काही गावकऱ्यांना एकत्र केले, नंतर त्यांचे हात बांधले आणि नंतर त्यांना पेटवून दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

गंभीर चिंता व्यक्त, अधिकृत पुष्टी नाही

संयुक्त राष्ट्रांनी या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. UN चे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी 11 लोकांच्या भीषण हत्यांच्या वृत्तांवर गंभीर चिंता व्यक्त केली आणि अशा हिंसाचाराचा तीव्र निषेध केला, विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये 5 लहान मुले आहेत. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नाही. 11 जणांचा मृत्यू कसा झाला याची देखील स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकली नाही. घटनास्थळी भेट दिलेल्या एका व्यक्तीने असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. ही घटना सामान्यतः स्वतंत्र म्यानमार मीडियाने केलेल्या घटनेच्या वर्णनाशी जुळते.

पीपल्स डिफेन्स फोर्स'चे सदस्य नव्हते

स्थानिक शेतकरी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अटक करण्यात आलेले लोकं 'पीपल्स डिफेन्स फोर्स'चे सदस्य नव्हते, ज्यांची सैनिकांशी अनेकदा चकमक झाली आहे. अशी माहिती मळत आहे. त्यांनी सैनिकांच्या हल्ल्याचे कोणतेही कारण सांगितले नाही. अटक केल्यानंतर ज्यांना जिवंत जाळण्यात आले, मृताचे वय 14 ते 40 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले.

कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा द्या

UN संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी "११ जणांच्या निर्घृण हत्येच्या" वृत्तावर तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी हिंसाचाराचा तीव्र शब्दात निषेध केला आणि सांगितले की, विश्वासार्ह वृत्तानुसार, मारल्या गेलेल्यांमध्ये 5 मुलांचा समावेश आहे. दुजारिक यांनी म्यानमारच्या लष्करी अधिकार्‍यांना जागतिक कायद्यांतर्गत नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि या घृणास्पद कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली.


सू की यांच्या शिक्षेवर UNSC चिंतेत

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) ने म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की, माजी अध्यक्ष विन मिंट आणि इतरांना शिक्षा सुनावल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. सू की यांना हिंसा भडकवल्याबद्दल आणि COVID-19 निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आणि त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या लष्करी बंडाच्या आधी 76 वर्षीय सू की म्यानमारच्या नेत्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT