French election eSakal
ग्लोबल

France Election: फ्रान्समध्ये निकालाआधी हिंसा उसळली! अनेक ठिकाणी जाळपोळ; 30 हजार सैनिक तैनात

French election results showed a left-wing coalition poised to claim the majority: आंदोलनकर्त्यांनी पॅरिसमध्ये गोंधळ घातलाय. अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झडप पाहायला मिळाली आहे.

कार्तिक पुजारी

पॅरिस- फ्रान्समध्ये सत्ताकारणात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या अंदाजांची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर रविवारी रात्री पॅरिसमध्ये आंदोलकांनी मोठा राडा घातल्याचं कळत आहे. आंदोलनकर्त्यांनी पॅरिसमध्ये गोंधळ घातलाय. अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झडप पाहायला मिळाली आहे.

एक्झिट पोलमध्ये डाव्या विचारसरणीच्या आघाडीला सर्वाधिक निवडणुकीमध्ये सर्वात जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रोन यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मॅक्रोनसाठी हा मोठ्ठा धक्का आहे. दुसरीकडे उजव्या विचारसरणीच्या ले पेन यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. फ्रान्समध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्रिशंकू स्थिती पाहायला मिळू शकते.

फ्रान्समध्ये आतापर्यंत सोबत येऊन पक्षांनी सरकार स्थापन केलेले नाही. त्यामुळे येत्या काळात फ्रान्समध्ये राजनैतिक आणि आर्थिक अस्थिरता पाहायला मिळू शकते. याचीच झलक पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनंतर फ्रान्सच्या रस्त्यावर हिंसा भडकली आहे. बुरखाधारी आंदोलनकर्ते रस्त्यावर गोंधळ घालत असल्याचं काही व्हिडिओंमधून दिसून येत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

फ्रान्समधील कल समोर यायला लागले आहेत. आज दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होऊ शकेल. फ्रान्समध्ये ५७७ जागांसाठीचा निकाल आज जाहीर होईल. बहुमतासाठी २८९ जागांची आवश्यकता आहे. आतापर्यंत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेले नाही. एक्झिट पोलनुसार, पक्षाला १८४ ते १९८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. मॅक्रॉन यांच्या मध्यमार्गी पक्षाला १६० ते १६९ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर आरएन पक्षाला १३५ ते १४३ जागा मिळू शकतील. याचा अर्थ कोणताही एक पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही.

फ्रान्समध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असल्याने दंगलविरोधी ३० हजारांपेक्षा अधिक जवान देशात ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. सगळ्यात मोठ्या ठरलेल्या डाव्या पक्षाने वेतनाची किमान रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय इंधन आणि अन्नपदार्थांचे दर कमी करणार असल्याचं म्हटलंय. शिवाय, श्रीमंतांच्या संपत्तीवर कर आकारला जाईल असं आश्वासन दिलं आहे. सध्या डाव्या पक्षाने आनंदोत्सव सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT