Putin Cardiac Arrest eSakal
ग्लोबल

Putin Cardiac Arrest : पुतीन यांना हार्ट अटॅक, रुममध्येच खाली कोसळले; डॉक्टरांनी वाचवले प्राण - रिपोर्ट

एका टेलिग्राम चॅनलवरुन याबाबत दावा करण्यात आला आहे.

Sudesh

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना हार्ट अटॅक आला होता, असा दावा एका टेलिग्राम चॅनलने केला आहे. ते आपल्या खोलीमध्ये खाली कोसळलेले आढळले. यानंतर डॉक्टरांनी वेळीच त्यांच्यावर उपचार करुन त्यांचा जीव वाचवला, असं या चॅनलने सांगितलं आहे. क्रेमलिनमधील एका माजी अधिकाऱ्याचं हे चॅनल असल्याचं सांगण्यात येत आहे.

WION या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ही घटना रविवारी (22 ऑक्टोबर) घडल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत माहिती समजतचाच त्वरीत डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं, आणि पुतीन यांना तातडीने त्यांच्या निवासस्थानी असलेल्या आयसीयू फॅसिलिटीमध्ये नेण्यात आलं.

General SVR नावाच्या टेलिग्राम चॅनलवरुन याबाबत माहिती देण्यात आली. हे चॅनल रशियाच्या माजी लेफ्टनंट जनरलचं असल्याचं सांगण्यात येत आहे. या चॅनलवरुन सांगण्यात आलं, की "पुतीन यांच्या निवासस्थानी तैनात असणाऱ्या दोन सिक्युरिटी ऑफिसर्सना अचानक आतून काहीतरी कोसळल्याचा आवाज आला. ते आत गेले असता, पुतीन फरशीवर कोसळलेले दिसून आले. त्यानंतर तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले."

डुप्लिकेट पुतीनचा वापर?

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून पाश्चिमात्य माध्यमांमध्ये पुतीन यांच्या तब्येतीबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. पुतीन हे मोठ्या प्रमाणात आजारी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच ते लोकांसमोर येण्याचं प्रमाणही कमी झाल्याचं म्हटलं जात आहे. जनरल एसव्हीआर या चॅनलवरुन पूर्वी असाही दावा करण्यात आला होता, की चीन दौऱ्यावर गेलेले पुतीन हे खरोखरचे पुतीन नसून, त्यांच्यासारखी दिसणारी दुसरीच व्यक्ती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT