Vladimir Putin
Vladimir Putin  
ग्लोबल

Russian Election Putin: रशियामध्ये पुतिन पुन्हा सत्तेत; 87 टक्के मते मिळाली, 200 वर्षांत पहिल्यांदाच झालं असं!

कार्तिक पुजारी

मॉस्को- रशियामध्ये पुन्हा एकदा व्लादिमीर पुतिन सत्तेमध्ये आले आहेत. रशियातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते विजयी झाल्याने सहा वर्षे आणखी ते सत्तेत राहतील. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना तब्बल ८७ टक्के मते मिळाली आहेत. 'द गार्डियन'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.(Vladimir Putin has claimed a landslide victory in Russia presidential vote global news)

रशियाच्या निवडणुकीत पुतिन यांचाच विजय होईल अशीच शक्यता होती. कारण, त्यांच्यासमोर कोणी तगडा प्रतिस्पर्धी नव्हता. जे काही विरोधी नेते होते ते परदेशात होते किंवा त्यांचा अकस्मात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुतिन यांना आव्हान देणारं कोणी समोर नव्हतं. त्यामुळे त्यांचा विजय औपचारिकता होती. पुतिन यांच्याकडे गेल्या २५ वर्षांपासून रशियाची सूत्रे आहेत.

रशियात पुतिन यांच्या हुकूमशाही विरोधात लोकांनी तीव्र आंदोलन केले होते. अनेक लोक रस्त्यावर उतरले होते. पण, त्यांचे आंदोलन चिरडण्यात आले आहे. पश्चिमी देशातील मीडियातून या निवडणुकांवर आक्षेप घेण्यात आला होता. रशियातील निवडणुका म्हणजे शुद्ध फसवणूक असल्याचं माध्यमातून म्हणण्यात आलं होतं. पण, पुतिन यांनी झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

पुतिन यांनी आणखी सहा वर्षांसाठी सत्ता आपल्या हातात घेतली आहे. गेल्या २०० वर्षातील सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणारा नेता म्हणून व्लादिमीर पुतिन यांची ओळख आता होणार आहे. AFP न्यूज एजेन्सीने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. युक्रेनने रशियाला थकवले असले तरी आता त्याची शक्ती कमी पडत आहे. युक्रेनला पश्चिमी देशांकडून मदतीची गरज आहे, पण हवी तितची मदत मिळत नाहीये. रशियाच्या निवडणुकीत युद्धाचा मुद्दा देखील महत्त्वाचा होता. शिवाय पुतिन यांचे कट्टर विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांचा गूढ मृत्यू झाल्यामुळे पुतिन यांच्या विरोधात वातावरण होते. मात्र, त्याचा परिणाम निवडणुकीवर झालेला दिसत नाही. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT