Narendra Modi And Vladimir Putin  esakal
ग्लोबल

G20 Summit : रशिया-युक्रेन युद्ध सुरु असतानाच पुतिन येणार भारत दौऱ्यावर? G20 परिषदेत सहभागीची शक्यता

वर्षभरापासून सुरु असलेलं रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia and Ukraine War) संपण्याचं नाव घेत नाहीये.

सकाळ डिजिटल टीम

G20 मध्ये रशियाचा संपूर्ण सहभाग आहे. तो पुढंही कायम राहील, असंही पेस्कोव्ह यांनी म्हटलं.

वर्षभरापासून सुरु असलेलं रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia and Ukraine War) संपण्याचं नाव घेत नाहीये. व्लादिमीर पुतिन यांच्या या भूमिकेमुळं जगभरातील देश त्यांच्यावर नाराज आहेत.

मात्र, आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) भारतात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहू शकतात, असं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

पुतिन भारतातील शिखर परिषदेत सहभागी होणार का? यावर पेस्कोव्ह (Dmitry Peskov) यांनी सांगितलं की, “हे शक्य होऊ शकतं. पण, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही, असं वृत्त रशियन वृत्तसंस्था Tass नं दिलं आहे.

G20 मध्ये रशियाचा संपूर्ण सहभाग आहे. तो पुढंही कायम राहील, असंही पेस्कोव्ह यांनी म्हटलं. गेल्या वर्षी G20 नेत्यांच्या मंचावर रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी रशियन शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं होतं. 2020 आणि 2021 मध्ये पुतिन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे G20 शिखर परिषदेत सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT