Putin Enemies eSakal
ग्लोबल

Putin Enemies : कुणाला दिलं विष, तर कुणावर भाडोत्री गुंडांचा हल्ला; पुतीन यांना विरोध करणाऱ्यांना असं गाठलं काळाने!

Vladimir Putin : पुतीन यांच्या कित्येक विरोधकांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

Sudesh

रशियातील भाडोत्री सैन्य 'वॅगनर' आर्मीचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा मृत्यू झाल्याच्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत. बुधवारी एखा खासगी विमानाचा अपघात झाला. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला. या यानातील प्रवाशांमध्ये येवगेनीदेखील होते असं स्पष्ट झालं आहे. यामुळेच कित्येक विदेशी माध्यमांमध्ये त्यांच्या मृत्यूची बातमी सांगितली जात आहे.

येवगेनी यांनी जून महिन्यात रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याविरोधात बंड केलं होतं. खरंतर वॅगनर हा ग्रुप रशियासाठीच काम करतो, मात्र तरीही येवगेनी यांनी पुतीन विरोधात सशस्त्र बंडाचा पवित्रा घेतला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी "पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आपण सोडणार नाही" असा धमकीवजा इशारा पुतीन यांनी दिला होता.

यानंतर अचानक विमान दुर्घटनेत येवगेनींच्या मृत्यूची बातमी आल्यामुळे, यामागे रशियाचा - म्हणजेच पुतीन यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अर्थात, अशा प्रकारचे आरोप होण्याची पुतीन यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील पुतीन यांच्या कित्येक विरोधकांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

रवील मॅगानोव

लुकोईल नावाच्या तेल कंपनीचे माजी चेअरमन रवील यांनी रशियावर टीका केली होती. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करत, त्यांनी हे युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं होतं. 2022 साली सप्टेंबर महिन्यात मॉस्कोतील एका रुग्णालयाच्या खिडकीतून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला होता.

मिखाईल लेसिन

रशियाचे माजी प्रेस मंत्री (माहिती व प्रसारण मंत्री) मिखाईल लेसिन यांचा 2015 साली रहस्यमयी पद्धतीने मृत्यू झाला होता. वॉशिंग्टन डीसीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. अमेरिकेत असताना लेसिन हे एफबीआयच्या संपर्कात होते. त्यांना रशियातील अंतर्गत गोष्टी माहिती होत्या. ही माहिती एफबीआयला मिळू नये यासाठी लेसिन यांचा काटा काढल्याच्या चर्चा आहेत.

अ‍ॅलेक्झँडर लिट्विनेंको

माजी केजीबी एजंट असणारे अ‍ॅलक्झँडर हे पुतीन यांच्यावर सातत्याने टीका करत. त्यांनी पुतीन यांच्यावर एका पत्रकाराच्या हत्येचा आरोपही केला होता. 2006 साली लंडनमध्ये विष घातलेला चहा पिल्याने अ‍ॅलेक्झँडर यांचा मृत्यू झाला होता.

अ‍ॅना पोलित्कोवस्काया

रशियन पत्रकार अ‍ॅना यांनी आपल्या पुस्तकात पुतीन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 'Putin's Russia' या पुस्तकात त्यांनी असा आरोप केला, की पुतीन यांनी रशियाला पोलीस स्टेट बनवलं आहे. यानंतर काही हल्लेखोरांनी अ‍ॅना यांची त्यांच्याच घराबाहेर हत्या केली होती. 2006 सालीच हेदेखील प्रकरण घडलं होतं.

बोरिस बेरेजोवस्की

रशियातील मोठे उद्योगपती बोरिस यांचा पुतीन यांच्यासोबत मोठा वाद झाला होता. यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी ते ब्रिटनला पळून गेले होते. तिथून त्यांनी पुन्हा पुतीन यांना धमकी दिली होती. मार्च 2013 मध्ये बोरिस यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं. ते ज्याठिकाणी राहत होते, तेथील बाथरुममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.

या सर्व प्रकरणांमध्ये दोन गोष्टी सारख्या होत्या. एक म्हणजे या सर्वांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुतीन यांच्या विरोधात जाण्याचं वक्तव्य किंवा कारवाई केली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सर्वांचा मृत्यू अगदी संशयास्पद परिस्थितीमध्ये झाला.

या सर्वाच्या मृत्यूसाठी पुतीन जबाबदार असल्याच्या चर्चा आहेत; मात्र तसा उघड म्हणण्यासाठी कुणाकडे पुरावे नाहीत. किंबहुना, तसं उघड उघड म्हणून पुतीन यांचा रोष ओढवून घेणं कुणालाही परवडणारं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT