Vladimir Putin Vladimir Putin
ग्लोबल

पुतीन यांचा प्रवास; गुप्तचर अधिकारी कसा झाला शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष

सकाळ डिजिटल टीम

व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) या नावाची काही काळापासून सर्वाधिक चर्चा होत आहे. पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. जवळपास तीन दशकांपासून सत्तेत सर्वोच्च पदावर कायम आहेत. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांचे जवळचे संबंध सर्वांना माहिती आहे. त्यामुळेच युक्रेन आणि रशियाच्या (Russia) युद्धात भारताने मध्यस्थी करण्याची मागणी केली जात आहे.

युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने पुतीन हे रशियाबाहेर जगभर चर्चेचा विषय झाले आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता आहे आणि व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) हे त्याच्या केंद्रस्थानी आहेत. यामुळेच की जग त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. पुतीन हे त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात रशियन गुप्तचर संस्था केजीबीचे अधिकारी होते. चला जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल...

व्लादिमीर पुतीन यांचा जन्म १९५२ मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. १९७५ मध्ये वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी ते KGB या गुप्तचर संस्थेत सहभागी झाले होते. १९९० पर्यंत तेथे अधिकारी म्हणून काम केले. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर त्यांना रशियाच्या (Russia) केंद्र सरकारने नियुक्त केले. या काळात त्यांचा सत्तेतील प्रवेश वाढला. १९९९ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी त्यांना त्यांच्या सरकारमध्ये वर्षभरासाठी पंतप्रधानपद सोपवले. यानंतर ते २००० मध्ये राष्ट्रपती झाले आणि तेव्हापासून या पदावर आहेत.

पुतीन यांचा युरोपात जबरदस्त प्रभाव

युरोपातील सर्व देश तेल आणि वायू पुरवठ्यासाठी रशियावर अवलंबून आहेत. यामुळे पुतीन (Vladimir Putin) यांचा युरोपात जबरदस्त प्रभाव आहे. रशियन कंपनी गॅझप्रॉम युरोपियन युनियनला गॅस आणि तेल पुरवण्यात आघाडीवर आहे. रशियामध्ये (Russia) एखादी व्यक्ती सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होऊ शकते. ते कमी करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांना काही काळासाठी राष्ट्राध्यक्ष बनवले आणि नंतर ते पुन्हा त्याच पदावर परतले. २०१२ मध्ये पुतीन दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष (President) म्हणून निवडून आले. दोन वर्षांनंतर त्यांनी क्रिमिया रशियाला जोडले. आता तब्बल आठ वर्षांनंतर त्यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत.

व्लादिमीर पुतीन यांचा जगात किती प्रभाव?

व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचा जगात किती प्रभाव आहे? हे यावरून समजू शकते की २०१३ आणि २०१६ मध्ये ते जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती म्हणून निवडले गेले होते. इतकेच नाही तर २०१७ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना सत्ता मिळाली. मात्र, पुतीन आणि ट्रम्प या दोघांनीही हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, पुतीन यांची २०१८ मध्ये चौथ्यांदा रशियाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT