ग्लोबल

Vladimir Putin: ''लंच ब्रेकमध्येही करा सेक्स..'' पुतीन यांनी देशातील तरुणांना का केलं आवाहन?

रशियाचे आरोग्यमंत्री डॉ. येवगेनी शेस्टोपालोव यांनी म्हटलं की, मुलं जन्माला घालण्यासाठी जॉबची बाधा असता कामा नये. रशियन लोकांना कुटुंब वाढीसाठी त्यांनी लंच आणि कॉफी ब्रेकचा फायदा घेण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

Russia News: रशियामध्ये लोकसंख्या घटण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे त्रस्त आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी पुतीन यांनी एक युक्ती शोधली आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुतीन यांनी नागरिकांना लंच ब्रंक आणि कॉफी ब्रेकमध्ये सेक्स करण्याचा सल्ला दिला आहे.

रशियामध्ये प्रजनन दर घटून प्रति महिला १.५ इतका खाली घसरला आहे. रशियासाठी ही मोठी चिंतेची बाब असून देशाची लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी महिलांचा प्रजनन दर कमीत कमी २.१ पाहिजे.

रशियाचे आरोग्यमंत्री डॉ. येवगेनी शेस्टोपालोव यांनी म्हटलं की, मुलं जन्माला घालण्यासाठी जॉबची बाधा असता कामा नये. रशियन लोकांना कुटुंब वाढीसाठी त्यांनी लंच आणि कॉफी ब्रेकचा फायदा घेण्याचं आवाहन केलं आहे.

ते म्हणाले की, कामामध्ये जास्त व्यस्त असणं हे सेक्स न करण्याचं वैध कारण नाही. हे केवळ एक ढोंग आहे. तुम्ही ब्रेकमध्ये सेक्स करु शकता. मॉस्कोमध्ये १८ ते ४० वर्षांच्या महिलांना त्यांचं प्रजनन स्वास्थ्य आणि क्षमतांचं मूल्यांकन करण्यासाठी निःशुल्क तपासणी करण्यात येणार आहे.

एवढंच नाही तर रशियातल्या चेल्याबिंस्क भागात अधिकाऱ्यांनी जन्मदर वाढवण्यासाठी आर्थिक मदत करणं सुरु केलं आहे. येते २४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना त्यांच्या पहिल्या मुलासाठी ९.४० लाख रुपये देण्याची योजना सुरु करण्यात आलेली असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.याशिवाय रशियामध्ये गर्भपातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मागच्या वर्षीपेक्षा १६ हजार मुलं कमी जन्माला आली

AFPच्या माहितीनुसार, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी जुलैमध्ये म्हटलं होतं की, जानेवारी आणि जून २०२४ यादरम्यान रशियामध्ये एकूण ५ लाख ९९ हजार ६०० मुलं जन्माला आली. हाच आकडा २०२३च्या तुलनेने १६ हजारांनी कमी आहे. हे देशासाठी धोक्याचं असल्याचं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे युद्धादरम्यान तब्बल १० लाख लोकांनी देशातून पलायन केलं आहे. यात युवकांची संख्या मोठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT