Vladimir Putin
Vladimir Putin Sakal
ग्लोबल

'सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर मला टॅक्सी चालवावी लागली'- पुतिन

सकाळ डिजिटल टीम

रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक आहेत. रशियामध्ये गेल्या 22 वर्षांपासून पुतिन यांची सत्ता आहे. जगातील सर्वात शक्तिशाली राजकीय नेत्यांपैकी एक असलेल्या पुतिन यांनी एका डॉक्युमेंट्रीमध्ये त्यांच्या सुरुवातीच्या दिवसातील संघर्षाचा उल्लेख केला आहे. सोव्हिएतच्या विघटनानंतरच्या काळात त्यांनी रशियात टॅक्सी चालवली होती असे त्यांनी सांगीतले.

आरआयए नोवोस्तीच्या डॉक्यूमेंट्रीनुसार (RIA-Novosti documentary) पुतिन यांनी सांगीतले की, 'कधीकधी त्यांना जास्त पैशांची गरज असे आणि त्यासाठी त्यांनी काही काळासाठी खाजगी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले, ते पुढे म्हणाले की, अशा गोष्टी बोलणे प्रामाणिकपणे सांगायचे तर मला अशा गोष्टींबद्दल बोलणे आवडत नाही, परंतु दुर्दैवाने ती वेळ तशी होती. KGB चे गुप्तहेर ते थेट रशियाच्या अध्यक्षपदापर्यंत पोचलेल्या पुतिन यांच्याकडे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे ते जगातील कोणत्याही राष्ट्रध्यक्षापेक्षा खूप वेगळे असल्याचे सिद्ध होते.

या डॉक्यूमेंट्रीमध्ये व्लादिमीर पुतिन यांनी तीन दशकांपूर्वी झालेल्या सोव्हिएत युनियन (USRR) च्या विघटनाबद्दल दुखः व्यक्त केले ते म्हणाले की, ही बऱ्याच नागरिकांसाठी एक शोकांतिका बनली आहे. सोव्हिएत युनियन कोसळल्याने गंभीर आर्थिक अस्थिरतेचा काळ आला, ज्यामुळे लाखो लोक गरिबीत बुडाले. कारण नव्याने स्वतंत्र झालेल्या रशियाने साम्यवाद सोडत भांडवलशाही स्विकारली होती. त्याकाळी व्लादिमीर पुतिन हे सोव्हिएत युनियनचे एकनिष्ठ सेवक होते. त्याचे विघटन झाल्यानंतर ते निराश झाले. त्यांनी एकदा सोव्हिएत युनियनच्या कोसळण्यालाल 20 व्या शतकातील सर्वात मोठी भू-राजकीय आपत्ती म्हटले होते.

जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक असलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे बालपण एका शेअर्ड अपार्टमेंटमध्ये गेले. हे ठिकाण सेंट पिट्सबर्ग येथे आहे. तर पुतीन यांना लहानपणापासूनच ज्युदो खेळाची आवड होती. यामध्ये त्यांनी अगदी लहान वयातच ब्लॅक बेल्ट मिळवला आणि पुतिन आजही ज्युदोचा सराव करतात.

महाविद्यालयानंतर पुतिन यांना सोव्हिएत युनियनच्या गुप्तचर संस्थेत साधारण नोकरी घेतली, त्यानंतर ते प्रगती करत केजीबीमध्ये लेफ्टनंट कर्नलच्या पदापर्यंत पोहोचू शकले.

या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुतिन यांची राजकीय कारकीर्द 1991 मध्ये सुरू झाली. 1996 मध्ये ते मॉस्कोला गेले, जिथे ते तत्कालीन अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या प्रशासनात सामील झाले. त्याकाळात येल्तसिन प्रशासनाच्या अराजकतेचा फायदा घेत अनेक लोकांना सत्तेपर्यंत पोहोचायचे होते आणि याचाच फायदा घेत पुतिन येल्तसिनचे उत्तराधिकारी बनण्यात यशस्वी झाले. येल्तसिन यांच्या राजीनाम्यापूर्वी पुतिन हे फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसचे संचालक आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव होते. 1999 मध्ये ते काही काळ मंत्रीही होते आणि त्यानंतर येल्तसिन यांच्या राजीनाम्यानंतर ते कार्यवाहक राष्ट्रपती झाले. चार महिन्यांनंतर झालेल्या निवडणुकीत देशाच्या राष्ट्राध्यक्षाची औपचारिक निवड करण्यात आली.

सोव्हिएत युनियनचे विघटन कधी झाले?

26 डिसेंबर 1991 रोजी सोव्हिएत युनियनचे विघटन झाले. या घोषणेमध्ये सोव्हिएत युनियनच्या पूर्वीच्या प्रजासत्ताकांना स्वतंत्र म्हणून स्वीकारण्यात आले. त्याचे विघटन होण्यापूर्वी, मिखाईल गोर्बाचेव्ह सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष होते. विसर्जनाची घोषणा होण्याच्या एक दिवस आधी त्यांनी राजीनामा दिला. सोव्हिएत युनियन, 15 प्रजासत्ताक गटांचा समूह एका रात्रीत फुटला आणि त्याचे गंभीर परिणाम जगभरात झाले आणि आज 25 वर्षांनंतरही त्याचे हादरे जाणवत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT