Volodymyr Zelenskyy invasion of Ukraine criticism of brutal treatment of civilians by Russian forces Brussels sakal
ग्लोबल

रशियाकडून मानवतेला काळीमा; युक्रेनच्या जनतेवरील अत्याचारांनंतर जगभरातून टीका

चौकशी सुरु करण्याची घोषणा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की

सकाळ वृत्तसेवा

ब्रुसेल्स : युक्रेनवर हल्ला केल्यानंतर येथील नागरिकांवर रशियन सैन्याकडून क्रूर अत्याचार होत असल्याची जगभरातून टीका होत आहे. रशियाकडून मोठ्या प्रमाणावर युद्धगुन्हे घडत असून त्यांनी मानवतेला काळीमा फासला असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याबाबत चौकशी सुरु करण्याची घोषणा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी केली आहे. ताब्यात आलेल्या प्रदेशातील नागरिकांचे हात बांधून त्यांच्यावर गोळीबार केला जात असल्याच्या आणि सामूहिक हत्याकांड होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनेक नागरिकांना अत्यंत जवळून गोळ्या घातल्याचे मृतदेहांवर असलेल्या खुणांवरून स्पष्ट झाले आहे.

या सर्व अत्याचारांना रशियाच जबाबदार असल्याची टीका युरोपीय महासंघाचे परराष्ट्र विभागाचे प्रमुख जोसेफ बॉरेल यांनी केली आहे. ‘युक्रेनमधील हत्याकांडाची छायाचित्रे विदारक आहेत. अनेक इमारतींचेही प्रचंड नुकसान झाले आहे. रशियाने युक्रेनच्या नागरिकांवर लादलेल्या या युद्धाचे हे भयावह चित्र आहे,’ असे बॉरेल यांनी म्हटले आहे. बुका या शहरात चारशेहून अधिक जणांचे मृतदेह आढळ्यानंतर रशियाने केलेल्या अत्याचारांची चर्चा होत आहे.

रशियावर जगभरातून टीका

पोलंड : रशिया पूर्णपणे फॅसिस्ट झाला असून युक्रेनमध्ये वंशच्छेद केला जात आहे. चौकशी आयोगाची स्थापना करून तपासणी केली जावी.

डेन्मार्क : युक्रेनमधील अत्याचार पाहून नाझींनी केलेल्या अत्याचारांची आठवण होते. हे युद्ध नाही, गुंडगिरी सुरु आहे.

फ्रान्स : रशियाने युद्धगुन्हाच केला आहे. या प्रकरणांच्या तपासासाठी युक्रेनला आम्ही सर्व प्रकारची मदत करू. गुन्हेगारांना शासन व्हायलाच हवे.

युरोपीय महासंघ : युद्धाचा हा क्रूर चेहरा आहे. रशियावर आणखी निर्बंध लादणे आवश्‍यक आहे.

जपान : रशियाने केलेल्या अत्याचारांमुळे धक्का बसला आहे. या प्रकरणांची आंतरराष्ट्रीय न्यायालयामार्फत चौकशी व्हावी.

न्यूझीलंड : महिलांवर बलात्कार आणि हत्याकांड करणे हा युद्धगुन्हाच आहे. रशियाने या अत्याचारांवर उत्तर द्यावे.

बुका येथे मृतदेह रस्त्यावर

किव्ह: रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला आज ४० दिवस पूर्ण झाले आहेत. युक्रेन येथील बुका येथे आतापर्यंतचे सर्वात भयानक हत्याकांड उघडकीस आले असून युक्रेनच्या दाव्यानुसार रशियाच्या सैनिकांनी बुका शहरातील ४०० हून लोकांची हत्या केल्याचे म्हटले आहे. मात्र रशियाने या हत्याकांडाचा आरोप फेटाळून लावला. दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीनुसार युक्रेनमध्ये आतापर्यंत १४१७ नागरिकांचा मृत्यू झाला असून २०३८ जण जखमी झाले आहेत.

रशियन सैनिकांची पिछेहाट असून रस्त्यावर मृतदेह आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. बुका शहरात आतापर्यंत चारशेहून अधिक जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यामुळे युक्रेनने रशियावर हत्याकांड घडवून आणल्याचा आरोप केला आहे. बूका शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मृतदेहांचा दफनविधी करण्यासाठी एका चर्चजवळ ४५ फुटाचा खड्डा तयार केला. अमेरिकी कंपनी मॅक्सार टेक्नोलॉजीने खड्ड्याचे सॅटेलाईट चित्र देखील जारी केले आहे. या फोटोत सेंट ॲड्रु आणि पायरवोझ्वनोहो ऑल सेंट्सच्या चर्चजवळ ४५ फूट खड्डा दिसतो. त्यात मृतदेह दफन केले असून संपूर्ण कबरीवर लाल माती पसरल्याचे दिसून येते. दरम्यान, रशियाने केलेल्या अत्याचारांची लवकरच चौकशी सुरु करण्याची घोषणा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी केली आहे. या चौकशी समितीमध्ये आंतरराष्ट्रीय तपास अधिकाऱ्यांचाही समावेश असेल, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident Video: पुण्यात बसचा थरार! चालक उतरला अन् बस चालू लागली; चालत्या गाडीतून प्रवाशांच्या उड्या

Asim Sarode: अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यास ‘बीसीआय’ची स्थगिती; आदेशात नेमकं काय म्हटलं?

Mangalwedha News : नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना प्रतीक्षा

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT