Voting for the upper house election in Japan  
ग्लोबल

आबेंच्या हत्येच्या छायेत जपानमध्ये मतदान

आबे यांच्याच पक्षालाच मोठा विजय मिळण्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

टोकियो - माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्या शुक्रवारी (ता. ८) झालेल्या हत्येच्या छायेत आज जपानमध्ये वरीष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीमध्ये आपल्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रचारासाठी भाषण करत असतानाच हल्लेखोराने आबे यांना गोळी मारली होती. या निवडणुकीत आबे यांच्याच पक्षालाच मोठा विजय मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आबे हे जपानच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी व्यक्तीमत्त्व होते. त्यामुळे आजच्या निवडणुकीला अचानक मोठे महत्त्व आले आहे. आबे यांच्यावरील गोळीबारानंतर जवळपास सर्वच नेत्यांनी या घटनेचा निषेध करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व सांगितले. आपली लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया हिंसाचारासमोर झुकणार नाही, हे मतदारांनी दाखवून द्यावे, असे आवाहन जपानचे पंतप्रधान फ्युमिओ किशिदा यांनी केले.

दरम्यान, जपानी नागरिक मतदान करत असतानाच शिंझो आबे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तेत्सुया यामागामी या हल्लेखोराला अधिक चौकशीसाठी स्थानिक चौकशी समितीच्या ताब्यात देण्यात आले. सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्यानेच हल्लेखोर आबे यांच्या नजीकपर्यंत जाऊन गोळी मारू शकला, असे पोलिसांनी मान्य केले आहे. आज आबे यांचे पार्थिव मृतदेह टोकियो येथे आणण्यात आले. त्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT