Russia Mutiny eSakal
ग्लोबल

Russia War : रशियातील गृहयुद्ध टळलं! वॅगनर प्रमुखाने दिले सैन्याला मागे हटण्याचे आदेश; रक्तपात टाळण्यासाठी निर्णय

वॅगनर यांच्यावरील आरोप मागे घेण्यात येणार आहेत.

Sudesh

रशियामध्ये वॅगनर या भाडोत्री सैन्याने केलेल्या बंडामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता वॅगनर ग्रुपच्या प्रमुखांनी आपल्या सैन्याला मागे हटण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी या अंतर्गत युद्धाचे सावट हटले आहे. (Russia Mutiny)

गेल्या दीड वर्षांपासून रशियाचे युक्रेनसोबत युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये रशियाने वॅगनर या भाडोत्री सैनिकांच्या ग्रुपचा वापर केला होता. युक्रेनमध्ये या ग्रुपचे ५० हजारांहून अधिक सैनिक होते. मात्र, शनिवारी या ग्रुपने अचानक सशस्त्र विद्रोह केला. या सैन्याने रशियातील दोन शहरं आपल्या ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. (Russia War)

वॅगनर ग्रुपचे हजारो सैनिक रशियाची राजधानी मॉस्कोकडे रवाना झाले होते. रशियातील संरक्षण मंत्र्यांनी आपल्यासोबत भेदभाव केल्यामुळे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी वॅगनर ग्रुपची मागणी होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या विद्रोहाला देशद्रोह म्हणत, पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आपण सोडणार नाही अशी घोषणा केली होती.

वॅगनर प्रमुखांची माघार

पुतीन यांच्या या घोषणेनंतर काही तासांनी वॅगनर प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी आपल्या सैन्याला माघार घेण्याचे आदेश दिले. या युद्धामुळे होणारा रक्तपात टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, आपण राष्ट्रद्रोह केला नसून, आपल्या हक्कांसाठी लढाई लढत असल्याचंही ते म्हणाले.

बेलारुसने केली मध्यस्थी

पुतीन यांच्या सहमतीनंतर बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्झँडर लुकाशेंको यांनी प्रिगोझिनसोबत चर्चा केली. त्यानंतर येवगेनी यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. बेलारुसच्या राष्ट्रपती कार्यालयाने याबाबतची माहिती दिली.

देशद्रोहाचे आरोप हटणार

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री एस. पेसकोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्याला मागे हटण्याचे आदेश दिल्यामुळे, वॅगनर यांच्यावरील आरोप मागे घेण्यात येणार आहेत. आता प्रिगोझिन बेलारुसला जातील. तसेच, वॅगनर ग्रुपमधील जे सैनिक विद्रोहात सहभागी नव्हते, ते रशियन संरक्षण मंत्रालयासोबत पुन्हा करार करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT