Amazing Advertisement In Thailand Amazing Advertisement In Thailand
ग्लोबल

नवऱ्यासाठी हव्यात तीन तीन मुली; बायकोने स्वतः दिली जाहिरात

मी माझ्या पतीला जिच्याशी वाटेल तिच्यासोबत राहण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे

सकाळ डिजिटल टीम

Wife Advertisement In Thailand लग्न आणि नात्याची अनेक विचित्र प्रकरणे जगभरातून समोर येतात. कधी-कधी अशी घटना समोर येते की पती-पत्नीमध्ये तिसरा व्यक्ती येतो. यामुळे खुनाचीही घटना घडते. परंतु, पत्नी स्वतः पतीसाठी मुलगी शोधत असल्याच्या बातमीवर तुम्ही विश्वास करणार नाही. मात्र, हे खरं आहे. पत्नी पतीसाठी मुलगी शोधत असून, तीन मुलींची मागणी केली आहे. तसेच एक जाहिरातही (Advertisement) काढली आहे.

थायलंडमध्ये (Thailand) राहणाऱ्या महिलेचे नाव पत्थीमा आहे. तिने पतीसाठी तीन मुलींची गरज असल्याची जाहिराती (Advertisement) दिली आहे. या जाहिरातीत तिने कोणत्या प्रकारची मुलगी हवी आहे हे देखील सांगितले. तिने ही जाहिरात का काढली हे देखील सांगितले आहे. तिला पतीसाठी एक मुलगी भेटली पण आहे. आता दोन मुलींची गरज आहे.

महिलेला अनेक आजार आहे. त्यामुळे ती पतीची काळजी घेऊ शकत नाही. मी माझ्या पतीला जिच्याशी वाटेल तिच्यासोबत राहण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. मी त्यांना यात मदत करीत आहे. ती अशा महिलांच्या शोधात आहेत ज्या तिच्या पतीला आनंदी ठेवू शकेल. त्यांच्या कामातही मदत करू शकतील. त्या बदल्यात मुलींनाही महिन्याला पैसे दिले जातील, असे मुली शोधणाऱ्या पत्नीने सांगितले.

या महिलेने तिच्या सोशल मीडियावर जाहिरात दिली आहे. अर्ज करणाऱ्या महिलांची एचआयव्ही चाचणी आवश्यक असल्याचे महिलेने लिहिले आहे. मुलगी ३० ते ३५ वर्षांची असावी. तिच्याकडे हायस्कूल किंवा बॅचलर पदवी असावी. महिलांचे राहणे व जेवणही मोफत असेल. सध्या महिलेची जाहिरात चांगलीच व्हायरल होत आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT