Gaza War eSakal
ग्लोबल

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

गाझातील संघर्षामुळे सुमारे २० लाख लोक निर्वासित झाले असल्याने त्याचा परिणाम म्हणून उपासमारी झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.

वृत्तसंस्था

World Hunger : जगभरात मागील वर्षी ५९ देशांमधील २८ कोटींहून अधिक लोकांना प्रचंड उपासमारीचा सामना करावा लागला. गाझातील संघर्षामुळे सुमारे २० लाख लोक निर्वासित झाले असल्याने त्याचा परिणाम म्हणून उपासमारी झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.

या अहवालानुसार, २०२२ या वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये अडीच कोटी अधिक जणांना उपासमार सहन करावी लागली. सुदान आणि गाझामधील संघर्षग्रस्त स्थितीमुळे ही संख्या वाढली. अतिप्रचंड उपासमारीचा सामना करत असलेल्या सुमारे पावणे सहा लाख लोकांपैकी ८० टक्के जण गाझामधील आहेत.

येथे समस्या गंभीर

प्रचंड उपासमारी : गाझा पट्टी, सुदान, बुर्किना फासो, सोमालिया आणि माली

अन्नटंचाईची शक्यता : पूर्व आफ्रिका, मलावी, झांबिया आणि झिंबाब्वे

देश आणि अन्नटंचाईचे प्रमाण (टक्क्यांमध्ये)

  • गाझा (१००)

  • दक्षिण सुदान (६२)

  • येमेन (५९)

  • सीरिया (५८)

  • हैती (५०)

  • अफगाणिस्तान (४८)

  • सेंट्रल आफ्रिका रिपब्लिक (४४)

  • सुदान (४२)

  • सोमालिया (३९)

  • लेबनॉन (३८)

War and Hunger

उपासमारीची स्थिती

५९ देश : उपासमारीचा सामना करणारी २८ कोटी लोकसंख्या

५ देश : अतिप्रचंड उपासमारीचा सामना करणारी ७ लाख ०५ हजार लोकसंख्या

३९ देश : प्रचंड उपासमारीचा सामना करणारी ३.६० कोटी लोकसंख्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT