War Zones esakal
ग्लोबल

War Zones: युद्धामुळे 20 कोटी मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर परिणाम; युनिसेफचा अहवाल

युक्रेन आणि रशिया या देशांमधील संघर्ष अद्यापही सुरुच आहे.

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन आणि रशिया या देशांमधील संघर्ष अद्यापही सुरुच आहे. या युद्धाला आता नऊ महिने पूर्ण होतील. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला करत या युद्धाला सुरुवात केली होती. तेव्हापासून रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरुच आहेत. दरम्यान, युनिसेफचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे 20 कोटी मुलांचे नुकसान झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यामध्ये केवळ रशिया युक्रेन देश नसून अफगाणिस्तान, सीरिया-इराक-यमन, आर्मीनिया-अजरबैजान यांसारख्या देशांचाही यामध्ये समावेश आहे. (War Zones UNICEF children Russia Ukraine fight Afghanistan Syria Iraq yemen )

सीरिया-इराक-येमेन, आर्मेनिया-अझरबैजान तसेच, माली, सुदान, काँगो, सोमालिया, नायजेरिया, कॅमेरून यासह जगाच्या अनेक भागांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात दररोज हजारो-लाखो लोक मरत आहेत. गोळीबार-बॉम्बफेक, क्षेपणास्त्र हल्ले आणि हवाई हल्ल्यात त्याहून कितीतरी पटीने अधिक लोक अपंग होत आहेत. लाखो लोकांची घरे उद्ध्वस्त होत आहेत. तर काही लोक बेघर होतायत. शाळा, रुग्णालये उद्धवस्त होताना दिसत आहेत.

हेही वाचा: Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?

युद्धात सहभागी देश कोणताही असो, जगातील कोणताही प्रदेश असो, पण यासर्वात महिलांसह लहानमुलांचे हात अधिक होत असल्याची माहिती समोर आली आहे. युनिसेफच्या आकडेवारीनुसार, युद्ध-लँडमाइन स्फोट, हवाई हल्ले आणि स्फोटांमध्ये मारल्या गेलेल्या एकूण लोकांपैकी निम्मी मुले आहेत. युनिसेफच्या आकडेवारीनुसार, आज २० कोटी लहान मुलांना जगातील सर्वात धोकादायक वॉर झोनने वेढले आहे.

तर हवामान बदल-दहशतवाद यांसारख्या इतर समस्यांचाही समावेश केला तर ४२० कोटीपेक्षा अधिक लहान मुलं संघर्षमय जीवन जगत आहेत. म्हणजेच जगातील प्रत्येक ६ मुलांपैकी १ मुले संघर्षाच्या क्षेत्रात राहत असल्याचे युनिसेफने म्हटले आहे.

तसेच, युद्धजन्य भागात 90 दशलक्षाहून अधिक किशोरवयीन मुलींचा समावेश आहे. ज्यांचे वय 10 ते 17 वर्षे दरम्यान आहे. युद्ध-दहशतवादा यांसारख्या गोष्टीमुळे त्यांचे भविष्य अंधारात आहे. या युद्धक्षेत्रांमध्ये ना बाल हक्कांचे संरक्षण आहे, ना मानवी हक्कांचे पालन करणारी कोणतीही यंत्रणा. या कोट्यवधी मुलांना येथे शोषण, उपासमार, बाल तस्करी आणि अत्याचारांना सामोरे जात आहेत.

UN च्या अहवालानुसार, या संघर्ष झोनमध्ये मुलांवर अत्याचार आणि अत्याचाराच्या मोठ्याप्रमाणात केसेस दररोज नोंदल्या जातात आणि अशा केसेस हजारो नाही तर लाखोंच्या संख्येत आहेत. या अशा परिस्थितीमुळे या भागात अडकलेल्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. जी मुले युद्धातून वाचली आहेत त्यांचे जीवन निर्वासितांच्या छावण्यांमध्ये बंदिस्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जयपूरमध्ये थरार! १२० किमीचा वेग, मद्यधुंद चालक अन् दोन कारमध्ये शर्यत; 'ऑडी'नं 16 जणांना उडवलं

सोनाली बेंद्रेने केलं दशावतार सिनेमाचं कौतुक ; "आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं सांगणाऱ्या कथा.."

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Agricultural News : द्राक्षांची पंढरी संकटात! अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील ७० टक्के बागांना फळधारणाच नाही

TRAI चा दणका! स्पॅम कॉल्ससाठी जिओ,एअरटेल,Vi वर १५० कोटींचा दंड; युजर्सच्या 'या' फायद्यासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT