Joe Biden sakal
ग्लोबल

Joe Biden : ज्यो बायडेन यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रचार साधेपणाने

अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डमोक्रॅटिक पक्षाकडून विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन हे प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता आहे.

पीटीआय

अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डमोक्रॅटिक पक्षाकडून विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन हे प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डमोक्रॅटिक पक्षाकडून विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन हे प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता आहे. बायडेन यांचा प्रचार साधेपणाने होणार आहे.

पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीची रूपरेषा बायडेन हे या आठवड्यात व्हिडिओद्वारे जाहीर करणार आहेत. गेल्या काही महिन्यांतील त्यांच्या योजना आणि संदेश यांचे प्रतिबिंब त्यात दिसेल. त्यांच्या सुरुवातीच्या दोन वर्षांतील यशस्वी कामगिरी, टोकाच्या समजल्या जाणाऱ्या रिपब्लिकन धोरणांशी तीव्र विरोधाभास आणि त्यांच्या वयाबाबतच्या चिंता दूर करण्यावर बायडेन या व्हिडिओत भाष्य करणार आहेत.

गेल्या वर्षी रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ इमारतीचा ताबा घेतल्यापासून ते अव्याहत प्रचार करत असल्याचा दावा बायडेन यांच्या सहाय्यकाने केला. त्यांच्या प्रशासनाकडून नवीन पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि हवामानविषयक कायदे यांची अंमलबजावणी कशी केली जात आहे, याची माहिती अमेरिकन लोकांना देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही सांगण्यात आले.

बायडेन यांनी गेल्‍या सहा महिन्यांत केलेली कामे आणि आगामी महिन्यांतील त्यांचे कार्य आणि संदेश हे अविभाज्य असेल. २०२४ च्या राजकीय परिस्थितीचा आढावा मतदार घेत असल्याने संदर्भाची व्याप्ती अपरिहार्यपणे बदलण्याची शक्यता सहाय्यकाने व्यक्त केली.

निवडणुकीपूर्वी, अधिकृत प्रचाराची घोषणा होण्यापूर्वी, त्यादरम्यान आणि नंतरही अध्यक्ष ज्यो बायडेन हे मजबूतपणे बाजू मांडतील.

- स्कॉट मूलहॉसर, बायडेन यांचा माजी प्रवक्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT