pakistan pm shehbaz sharif  sakal
ग्लोबल

Pakistan Election : पाकिस्तानमध्ये निवडणुकीचा मार्ग झाला मोकळा

पाकिस्तानचे मावळते पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या शिफारसीनुसार अध्यक्ष अरिफ अल्वी यांनी नॅशनल असेंब्ली मुदत संपण्यापूर्वीच काल रात्री उशीरा विसर्जित केली.

पीटीआय

इस्लामाबाद - पाकिस्तानचे मावळते पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या शिफारसीनुसार अध्यक्ष अरिफ अल्वी यांनी नॅशनल असेंब्ली मुदत संपण्यापूर्वीच काल रात्री उशीरा विसर्जित केली. यामुळे शरीफ सरकारचा कार्यकाळ संपुष्टात आला असून सार्वत्रिक निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, काळजीवाहू सरकारचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे, याबाबत पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात खलबते सुरु झाली आहेत.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचा कार्यकाळ १२ ऑगस्टला पूर्ण होत होता. मात्र, शरीफ यांनी बुधवारीच अध्यक्ष अल्वी यांना पत्र लिहीत असेंब्लीचे विसर्जन करण्याची विनंती केली. त्यानंतर अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ‘ऐवान ए सद्र’ने एक परिपत्रक जारी करत घटनेच्या कलम ५८ अंतर्गत नॅशनल असेंब्ली विसर्जित करत असल्याचे जाहीर केले.

सरकारने कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ६० दिवसांत निवडणूक घेणे बंधनकारक असते. मात्र, मुदतपूर्व विसर्जन झाल्यास निवडणूक घेण्यासाठी ९० दिवसांचा वेळ मिळतो.

सरकारला ११ ऑगस्टपर्यंत सत्तेवर राहण्याची इच्छा होती. मात्र, अल्वी हे इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाचे नेते असल्याने ऐनवेळी त्यांनी सरकारची शिफारस नामंजूर केल्यास अडचण निर्माण होऊ शकते, असे मत मुस्लीम लीगमधील नेत्यांनी व्यक्त केल्याने दोन दिवस आधीच सभागृह विसर्जित करण्याची सूचना केली. निवडणूक निष्पक्षपाती वातावरणात होण्यासाठी काळजीवाहू सरकारची स्थापना केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT