ग्लोबल

या देशांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत आहेत विचित्र कायदे; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : देश तसा वेष आणि देश तितके कायदे. आणि कायद्यानुसार दंड. एका देशातील कायदे दुसऱ्या देशातील नागरिकांना अवाजवी किंवा जाचक वाटू शकतात. कायदे हे मानवी हित लक्षात घेऊनच तयार करण्यात येतात. मात्र शिस्त नाकारणाऱ्यांकडून कायदे मोडले जातात किंवा कधी शिस्तप्रिय व्यक्तीकडूनही अनावधानानेही कधी कधी कायदे मोडले जातात. पण दोन्हीसाठी शिक्षा सारखीच असते. जाणून घेऊया विविध देशातील विविध कायद्यांविषयी.

* लुईझियाना भागात पिझ्झा मागवल्यानंतर जर ती व्यक्ती पिझ्झा घ्यायला जागेवर हजर नसेल तर तब्बल ५०० डॉलर्सचा दंड आकारला जातो.

* एल साल्वाडोर भागात पिऊन गाडी चालवल्यास माणसावर जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. प्यायलेला माणूस फायरिंग स्क्वाडच्या निशाण्यावर आल्यास त्याच्यावर गोळीबार केला जातो. हे पूर्णपणे कायदेशीर आहे भाऊ!!

*. बेल्जियमच्या भागात पर्यटकांवर ब्रुसेल्स स्प्राऊट्स फेकणे चक्क कायदेशीर आहे. या कायद्याचा फटका पर्यटकांना ब्रुसेल्स स्प्राऊट्सच्या रुपात झेलावा लागतो.

* थायलंडमध्ये रस्त्यावर च्युईंग गम खाऊन थुंकल्यास तब्बल ६०० डॉलर्सचा दंड आहे.

* बोलिव्हियाच्या ‘ला पाझ’ भागात गरोदर स्त्रिया फक्त १ ग्लास वाईन घेऊ शकतात. त्यापेक्षा जास्त बेकायदेशीर आहे.

* कॅलिफोर्नियाच्या रिव्हरसाईड भागात सकाळी ११ ते १ वाजेच्या दरम्यान रस्त्यावरून जेवण घेऊन फिरण्यास मनाई आहे.

* कॅलिफोर्निया भागात बाथटबमध्ये बसून संत्री खाणे बेकायदेशीर आहे.
मंडळी, हा एक फार जुना कायदा आहे. १९२० साली लोकांची अशी समजूत झाली होती, की संत्र्यामध्ये असलेलं सायट्रिक आम्ल आणि आंघोळीसाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाचं मिश्रण होऊन विस्फोटक पदार्थ तयार होतो. हा कायदा अस्तित्वात असला तरी त्यातली अंधश्रद्धा आता निघून गेली आहे.

* गेन्सव्हिल, फ्लोरिडा भागात काट्याने चिकन खाणे बेकायदेशीर आहे. २००९ साली एका पर्यटकाला याबद्दल जेलची हवा खावी लागली होती राव.

* न्यूजर्सी भागात सूप पिताना आवाज करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. फुर्रss करून पिणाऱ्याने जपून राहावं!!

* बॉस्टनमधल्या एका कायद्यानुसार चर्चमध्ये शेंगदाणे खाण्यावर सक्त मनाई आहे.

* अमेरिकेच्या इंडियाना भागात जर तुम्ही लसूण खाऊन सिनेमाला गेलात तर तुम्हाला एन्ट्री नाकारली जाते. कारण अर्थातच ‘तोंडाचा वास’!!

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026: आतापर्यंत 'या' अर्थमंत्र्यांनी सादर केले सर्वाधिक अर्थसंकल्प

अकोलाचा महापौर ठरला! भाजपच्या शारदा खेडकर ४५ नगरसेवकांच्या पाठिंब्यानं विजयी, AIMIM तटस्थ राहिल्यानं चर्चांना उधाण!

Mumbai: आता ३० मिनिटांच्या प्रवासाला फक्त १० मिनिटे लागणार! मुंबईतील 'हा' महत्त्वाचा उड्डाणपूल पूर्ण होणार; कधी आणि कोणता?

St Bus Darshan : निवडणुकीच्या दिवशीच होते बसचे दर्शन; दुर्गम तालुक्यात नाही रस्ते; ‘गाव तिथे रस्ता’ कागदोपत्रीच

Gold Bag Returned Kolhapur Honesty : कोल्हापुरी लै भारी! दहा तोळे सोन्याची बॅग परत; केएमटी चालक-वाहकाच्या प्रामाणिकपणाचा आदर्श

SCROLL FOR NEXT