What is Bharat Mart Project in Dubai
What is Bharat Mart Project in Dubai 
ग्लोबल

Bharat Mart Project : काय आहे चीनचं टेन्शन वाढवणारा 'भारत मार्ट प्रोजेक्ट'?, PM मोदींनी UAE मध्ये केली पायाभरणी

रोहित कणसे

what is bharat mart project : पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपू्र्वी संयुक्त अरब अमीरात (UAE) च्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी अबू धाबी येथे पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन देखील केले. इतकेच नाही तर पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्यासोबत दुबईच्या जेबेल अली फ्री ट्रेड झोन येथे भारत मार्ट ची पायाभरणी देखील केली. भारत मार्ट हे एक व्यापारी केंद्र असेल जे भारती एमएमएमई कंपन्यांना आंदरराष्ट्रीय खरेदीदारांपर्यंत पोहचण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करेल.

भारत मार्ट नेमकं आहे काय?

हा प्रोजेक्ट आत्मनिर्भर भारत योजनेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचे पाऊल असल्याचे बोलले जात आहे. २०२५ पर्यंत हा प्रोजेक्ट बनून तयार होईल, तसेच याचा वापर सुरू केला जाईल अशी अपेक्षा आहे. याची उभारणी डीपी वर्ल्ड करणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार भारताच्या सुक्ष्म आणि लघु तसेच मध्यम उद्योगांच्या उत्पादनांना आखाती देश, पश्चिम आशिया, आफ्रीका आणि युरेशिया प्रदेशातील आंतरराष्ट्रीय खरेदीदारांपर्यंत पोहचवण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ यामुळे मिळणार आहे. सोबतच यामुळे निर्यातीला देखील चालना मिळण्यास मदत होईल.

हा मार्ट जेबेल अली बंदराच्या जवळ उभारला जात आहे, जे भारतीय कंपन्यांना तेथे वेयर हाउस सुविधा उपलब्ध करून देईल. याचा राजकीय तसेच लॉजिस्टिक क्षेत्रात फायदा मिळणार असून भारत-यूएई द्विपक्षीय व्यापार आणखी वाढण्यास मदत होईल. या वेयर हाउस फॅसिलीटी सेंटरमध्ये भारतीय MSME कंपन्या रिटेल शोरूम, गोदामे यांचा समावेश असेल, येथून भारतीय एमएसएमई कंपन्यांना आंतरराष्ट्रीय खरेदीदारांपर्यंत पोहचे सोपे होणार आहे.

चीनचं टेन्शन का वाढणार?

दुबईमध्ये चीनी कंपन्यांच्या प्रॉडक्ट्सचे एक आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र ड्रॅगन मार्ट आहे. ड्रॅगनच्या आकाराच्या या मार्टमध्ये चीनी कंपन्यांचे उत्पादने मिळतात. हा मार्ट ५० हजार स्क्वेअर मिटर जागेत बांधण्यात आलेला असून यामध्ये जवळपास ४००० रिटेल शॉप्स आहेत. आता याच्या बाजूलाच ड्रॅगन मार्ट- २ देखील सुरु झाला आहे. येथे रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि सिनेमा हॉलसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

आता त्याच शहरात अत्याधुनिक भारत मार्टची पायाभरणी झाल्याने चीनचं टेन्शन वाढला आहे. हा मार्ट २०२५ पर्यंत ऑपरेशनल होईल. भारत आणि युएईन २०३० पर्यंत नॉन पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आयत-निर्यात वाढवून ८.३ लाख कोटी रुपयांहून जास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भारत मार्ट संयुक्त अरब अमीरात सोबत इतर देशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या भारत मार्टमुळे विदेशातील बाजाात चीनी सामानाला टक्कर मिळेल तसेच भारतीय उत्पादने मीडल ईस्ट, सेंट्रल एशिया, यूरोप आणि इतर पश्चिमी देशात पोहचतील अशी भीती चीनला वाटत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast : आचारसंहिता होती अन्यथा...डोबिंवलीतील MIDC हलवण्याबाबत उद्योगमंत्र्यांचं मोठं विधान

Dombivli MIDC Blast: एक स्फोट... जमीन हादरली, संपूर्ण कंपनी बेचिराख; साखरपुडा सोडून लोक सैरावैरा पळू लागले

Virat Kohli : विराट कोहली पुढच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार; इंग्लंडचा माजी कर्णधार हे काय म्हणाला?

Dombivli MIDC Blast: डोंबिवलीतील केमिकल कंपनी भीषण स्फोटाने प्रोबेस स्फोटाच्या आठवणी झाल्या ताज्या

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फायदा, बँक-आयटी शेअर्स तेजीत

SCROLL FOR NEXT