New Year Celebration live
New Year Celebration live eSakal
ग्लोबल

New Year Celebration : घरबसल्या पाहा संपूर्ण जगभरातील नववर्षाचा जल्लोष; कुठे-कुठे पाहता येईल लाईव्ह?

Sudesh

New Year Celebration Live Stream : आज 2023 वर्षाचा शेवटचा दिवस आहे. जगभरातील लोक आज रात्री सरत्या वर्षाला निरोप देतील, आणि 12 वाजल्यानंतर नववर्षाचं जल्लोषात स्वागत करतील. विविध देशांमध्ये काही तासांच्या अंतराने हे सेलिब्रेशन (31st Celebration Live) केलं जाईल. फटाक्यांची आतषबाजी, लोकांचा जल्लोष अशा वातावरणात नववर्षाचं स्वागत केलं जाईल.

जगात विविध ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं जातंय हे तुम्ही घरबसल्या पाहू शकता. कितीतरी वेबसाईट्स जगभरातील सेलिब्रेशनचं लाईव्ह स्ट्रीमिंग (Where to watch new year celebration) करणार आहेत. या वेबसाईट्सची यादी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामुळे तुम्ही घरबसल्याच नववर्षाच्या जल्लोषात सहभागी होऊ शकाल.

EarthCam

अर्थकॅम या प्लॅटफॉर्मवर न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर (Times Square new year celebration) आणि जगभरातील इतर प्रसिद्ध ठिकाणांवरील न्यू-इयर सेलिब्रेशन पाहता येईल. या वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच प्रकारची सुविधा EarthTV नावाची वेबसाईटही पुरवते. याठिकाणी देखील तुम्ही जगभरातील विविध ठिकाणांची आतषबाजी पाहू शकता.

ResortTV1

रिसॉर्ट टीव्ही 1 या यूट्यूब चॅनलवर तुम्ही डिज्नीलँडमधील नववर्षाच्या स्वागताचा व्हिडिओ पाहू शकता. डिज्नीलँडमध्ये न्यू-इयर इव्हच्या निमित्ताने मोठी आतषबाजी होते. मॅजिक किंगडममध्ये थर्टी फस्टच्या पार्टीला आतापासूनच सुरुवातही झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT