बायडेन यांनी ठणकावले; गोपनीय अहवालातील विधाने फेटाळली
बायडेन यांनी ठणकावले; गोपनीय अहवालातील विधाने फेटाळली Sakal
ग्लोबल

Joe Biden : ‘‘माझी स्मरणशक्ती शाबूत आहे", बायडेन यांनी ठणकावले; गोपनीय अहवालातील विधाने फेटाळली

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ‘‘माझी स्मरणशक्ती शाबूत आहे,’’ असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (वय ८१) यांनी ठणकावून सांगितले. गुरुवारी (ता.८) रात्री बायडेन यांनी व्हाइट हाऊसमध्ये अचानक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते संतप्त झालेले दिसत होते.

बायडेन यांनी गोपनीय दस्तावेजांचा दुरुपयोग केल्याचा चौकशी अहवाल काल प्रसिद्ध झाला आहे. बायडेन यांना पूर्वीच्या घटना आठवत नसल्याचा दावा वृत्तात केला आहे. मुलाचे निधन कधी झाले, हे त्यांना आठवत नसल्याचा दावा त्यात केला आहे. त्यावरून भडकलेल्या बायडेन यांनी ‘त्यांची हिंमत कशी झाली?, असा सवाल करात हा दावा फेटाळून लावला. ‘माझी स्मरणशक्ती शाबूत आहे’, असे त्यांनी ठणकावले.

बायडेन काही गोपनीय कागदपत्रे जाणीवपूर्वक स्वतःकडे ठेवली आणि ती जाहीर केली, असा ठपका बायडेन यांच्यावर चौकशी अहवालात ठेवला आहे. परंतु त्यांना याबद्दल दोषी ठरविले नाही.

अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर अफगाणिस्तानमधील लष्करी आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित कागदपत्रे बेकायदा स्वतःकडे ठेवली, असे न्याय विभागाचे विशेष सल्लागार रॉबर्ट हर यांनी म्हटले आहे. काल प्रसिद्ध झालेल्या या ३४५ पानी अहवालात बायडेन यांच्याबद्दल अनेक विधाने केली आहेत. अध्यक्षांच्या स्मरणशक्ती कमकुवत आहे, असे त्यात म्हटले आहे.

चौकशीचा एक भाग म्हणून अध्यक्ष बायडेन यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाच तासांहून अधिक काळ मुलाखत घेतली होती.

रॉबर्ट हर म्हणाले, की बायडेन यांचा स्मरणशक्ती एवढी कमजोर आहे की बराक ओबामा सरकारमध्ये ते उपाध्यक्ष असतानाच्‍या काळातील तारखा आणि २०१५ मध्ये त्यांचे पुत्र ब्यू यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना आठवत नाही. बायडेन यांच्या स्मरणशक्तीची स्थिती पाहता दस्तावेजाच्या आरोपात न्यायाधीश त्यांना दोषी ठरविणार नाही.

‘मी देशाला पुन्हा उभे केले आहे’

पत्रकार परिषदेत बायडेन भावनिक झाले होते. स्मरणशक्तीवर शंका व्यक्त करणाऱ्या अहवालातील विधानांवर त्यांनी जोरदार टीका केली. ‘‘मला जे प्रश्‍न विचारण्यात आले त्याच्याशी इतरांचा काही संबंध नव्हता. ब्यू बायडेन याचे निधन कधी झाले याचा आठवण मला कोणीही करून देण्याची गरज नाही. मी व्यवस्थित आहे. मी वृद्ध आहे. मला माहीत आहे की मी काय करत आहे. मी या देशाला पुन्हा त्याच्या पायावर उभे केले आहेस,’’ असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT