Tharman Shanmugaratna Sakal
ग्लोबल

Singapore President : सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्न कोण?

दत्ता लवांडे

सिंगापूर : मुळचे भारतीय वंशाचे असलेले सिंगापूरचे अर्थशास्त्रज्ञ थर्मन षण्मुगरत्न यांची सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. २०११ नंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकांत थर्मन यांनी दोन चिनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून राष्ट्रपतीपदी आपली वर्णी लावली असून त्यांना एकूण मताच्या ७०.४ टक्के मते मिळाली आहेत.

थर्मन षण्मुगरत्न यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या एनजी कोक सॉन्ग यांना १५.७ टक्के तर टॅन किन लियान यांना १३.८ टक्के मते मिळाली आहेत. पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल थर्मन यांचे अभिनंदन केले. "मतदारांच्या मजबूत समर्थनामुळे मी नम्र झालो आहे" अशा शब्दांत थर्मन यांनी निवडणुकीनंतर मतदारांचे आभार मानले.

कोण आहेत भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्न?

थर्मन हे तमिळ वंशाचे सिंगापूर येथे वास्तव्यास असलेले नागरिक आहेत. ते सिंगापूरच्या राजकारणात मादगील ५० वर्षांपेक्षा अधिक काळ सक्रिय आहेत. सिंगापूरच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवून त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासह महत्त्वाच्या जागतिक राजकारणात वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय वंशाच्या नेत्यांच्या यादीत स्थान मिळवलंय.

थर्मन हे २००१ साली राजकारणात आले. तब्बल १२ वर्षानंतर अध्यक्षपदाच्या निवडीसाठी लागलेल्या निवडणुकीत त्यांनी जुलैमध्ये प्रचाराला सुरूवात केली होती. आपल्या देशाचे जगामध्ये वेगळे स्थान निर्माण करण्याचे आणि इथल्या संस्कृतीचा विकास आणि जतन करण्याचे वचन त्यांनी मतदारांना दिले होते.

थर्मन षण्मुगरत्न यांनी २०११ ते २०१९ पर्यंत सिंगापूरचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. त्याआधी त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातही काम केलं असून मंत्रीपदे भूषवली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT