Omicron
Omicron Sakal
ग्लोबल

Omicron ची लाट ओसरली! परंतु, BA.2 पासून सावध राहा : WHO

निनाद कुलकर्णी

जगभरात कोरोनाच्या तिसर्‍या (Corona Third Wave) लाटेसाठी कारणीभूत ठरलेल्या ओमिक्रॉनची (Omicron) लागण होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत घट नोंदवण्यात येत आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, लावण्यात आलेले अनेक निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. या सर्वामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ओमिक्रॉनच्या BA.2 या बदलत्या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याबाबत WHO एक व्हिडिओदेखील ट्वीट केला आहे. जगभरात नोंदल्या जात असलेल्या कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन संसर्गांमध्ये, पाचपैकी एकाला BA.2 संसर्ग होत असल्याचेही सांगण्यात आले आहे. (WHO Warns Against Sub Variant BA.2 Variant )

"ओमिक्रॉन विषाणूमध्ये बदल होत असून, त्याचे अनेक उप-स्वरुप (sub-lineage) तयार होत असून, होणाऱ्या या बदलांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे व्हिडिओमध्ये नमुद करण्यात आले आहे. बहुतेक सिक्वेनसेस BA.1. उप-स्वरुपामध्ये आढळून येत आहेत परंतु आम्हाला BA.2 ची सिक्वेनसेसची प्रकरणेही वेगाने सापडून येत आहे, अशी माहिती WHO च्या कोविड 19 टेक्निकल विभागाच्या प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह (Maria Van Kerkhove) यांनी व्हिडिओमध्ये दिली आहे.

कोविड 19 मुळे गेल्या आठवड्यात जगभरात 75,000 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याचे सांगत ओमिक्रॉनच्या BA.2 उपप्रकाराबाबत WHO तर्फे जगाला चेतावणी देण्यात आली आहे. BA.2 इतर कोरोनाच्या उप-स्वरुपांपेक्षा वेगाने पसरत असल्याचे म्हटले आहे. मात्र, BA.2 हा BA.1 पेक्षा जास्त प्राणघातक असल्याचा कोणताही पुरावा नसून, यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून असल्याचे केरखोव्ह यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट सैम्य नाहीये मात्र, यापूर्वा आलेल्या डेल्टाच्या तुलनेत कमी घातक असल्याचे व्हिडिओत सांगण्यात आले आहे. तसेच आजही ओमिक्रॉनची लागण होणारे अनेक रूग्ण रूग्णालयांमध्ये दाखल होत असल्याचे केरखोव्ह यांनी नमुद केले आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणात देखील वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळत असल्याचे केरखोव्ह यांनी म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना सामान्य सर्दी-तापासारखा असल्याची चूक करू नये, असे आवाहन करत अजूनही आपल्याला काळजी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT