queen elizabeth 
ग्लोबल

वर्णभेदाच्या आरोपानं ब्रिटीश राजघराणं दु:खी; राणी एलिझाबेथकडून मर्गेलच्या आरोपांची दखल

सकाळवृत्तसेवा

लंडन : ब्रिटनच्या राजघराण्याचा प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मर्केल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही होस्ट ऑप्रा विन्फ्रेनं मर्गेलची मुलाखत घेतली होती. यामध्ये ब्रिटीश राजघराणं खोटारडे असून जाणीवपूर्वक प्रतिमेवर डाग लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मर्केलनं यावेळी केला होता. लोकांना ब्रिटनचं राजघराणं म्हणजे स्वप्नांची दुनिया वाटते पण सत्य काही वेगळंच आहे. मला माझ्या पतीनं जितकं राजघराण्याबद्दल सांगितलं होतं तेवढंच माहिती होतं, असंही मर्केलनं यावेळी म्हटलं होतं. तिच्या या आरोपांवर आता राणी एलिझाबेथ II यांनी काल मंगळवारी गंभीर दखल घेतली आहे. 

त्यांनी एक वक्तव्य जाहीर करत याबाबतची भुमिका जाहीर केली आहे. त्यांनी म्हटलंय की, त्यांच्या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केलेलं गेल्या काही वर्षातलं खडतर आयुष्य ऐकून संपूर्ण राजघराण्याला दु:ख झाले आहे.  मुलाखतीत मांडलेले मुद्दे, खासकरुन वर्णभेदावरुन मांडलेला मुद्दा हा चिंताजनक आहे. त्या सगळ्या मुद्यांवर घराण्याअंतर्गत चर्चा करण्यात येईल. हॅरी, मेघन आणि आर्ची हे राजघराण्याचे नेहमीच लाडके सदस्य राहणार असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं आहे. झालेल्या मुलाखतीनंतर बंकिंगहम पॅलेस दबावामध्ये आला होता.

काय केले होते आरोप?
राजघराण्याला आमच्या मुलाचा रंग कसा असेल याची चिंता होती असं मर्केलनं मुलाखतीत सांगितलं होतं. मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांना पहिला मुलगा असून त्याचं नाव आर्ची आहे. मर्केल गर्भवती असतानाच राजघराण्याने प्रिन्सबाबतचा नियम बदलला. आर्चीचा रंग काळा असेल याची भीती राजघराण्याला होती आणि यामुळेच असा निर्णय घेतला गेला असा आरोपही मर्केलनं केलं आहे. सध्या मेगन मर्केल दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. होणारं हे अपत्य मुलगा की मुलगी हेसुद्धा प्रिन्स हॅरीने जाहीर केलं आहे. मेगनला होणारं पुढचं अपत्य मुलगी असणार आहे असं प्रिन्स हॅरीने या मुलाखतीवेळी जाहीर केलं. उन्हाळ्यात बाळाचा जन्म होईल आणि दोनच अपत्यानंतर पुन्हा बाळाचा विचार नाही असं प्रिन्स हॅरीने सांगितलं. 

राजघराण्यासोबत राहताना मनात आत्महत्येचे विचार येत होते, असा धक्कादायक खुलासा मेगन यांनी केला. त्यांनी म्हटलं की “मी राजघराणाऱ्यावर विश्वास ठेवला आणि हीच माझी सर्वात मोठी चूक होती. मला एकटं वाटत होतं, माझ्यावर अनेक बंधनं लादण्यात आली. मित्रांसोबत लंचला बाहेर जाण्याची परवानगी देखील नव्हती.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT