putin  
ग्लोबल

भारताचा जवळचा मित्र रशिया तालिबानला साथ देणार?

"या कट्टरपंथीय इस्लामिक गटाने आधीच्या राज्यकर्त्यांपेक्षा २४ तासात काबुलला सुरक्षित बनवले"

दीनानाथ परब

काबूल: पाकिस्तान, (pakistan) चीन (china) पाठोपाठ रशिया (Russia) सुद्धा तालिबानला अनुकूल भूमिका घेताना दिसत आहे. भारताचा जवळचा मित्र असलेला रशिया सुद्धा तालिबानच्या राजवटीचं (Taliban regime) समर्थन करणार का? असा प्रश्न यामुळे निर्माण होतोय. अफगाणिस्तानातील रशियाचे राजदूत दिमित्री झिरनोव्ह यांनी तालिबानच्या वर्तनाचं कौतुक केलं आहे. तालिबानची भूमिका चांगली, सकारात्मक आणि व्यवसाय अनुकूल असल्याचे दिमित्री म्हणाले. "या कट्टरपंथीय इस्लामिक गटाने आधीच्या राज्यकर्त्यांपेक्षा २४ तासात काबुलला सुरक्षित बनवले" असे दिमित्री यांचे मत आहे.

"काबूल शहरात सर्वत्र शांतता आणि चांगली परिस्थिती आहे. अश्रफ घनी यांच्यापेक्षा तालिबानच्या नेतृत्वाखाली काबुलमधली परिस्थिती चांगली आहे" असे दिमित्री झिरनोव्ह मॉस्कोच्या रेडिओ स्टेशन बरोबर बोलताना म्हणाले. "काल पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे घनी यांची राजवट कोसळली. कायदा-सुव्यवस्था ढासळून गेल्याचे चित्र होते. लुटारु रस्त्यावर आले होते" असे दिमित्री म्हणाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिलेय.

तालिबान काबुलपर्यंत पोहोचल्यानंतर अश्रफ घनी देश सोडून पळाले. तालिबानने ज्या विद्युत वेगाने अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवले, त्याने जगातील अनेक देशांना आश्चर्याचा धक्का बसलाय. आपल्याला रक्तपात नको होता, म्हणून देश सोडला, असे घनी यांनी सांगितले. ते कुठे आहेत, या बद्दल अजून स्पष्टत नाहीय.

अमेरिकेची काय भूमिका?

राष्ट्राला उद्देशून केलेल्या १५ मिनिटांच्या भाषणात जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी बोलवण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "अमेरिकन सैन्य माघारी बोलवण्याच्या आधी झालेल्या करारावर कायम राहायचे की, तिसऱ्या दशकाचे युद्ध लढण्यासाठी आणखी हजारो सैनिक पुन्हा पाठवायचे. यापैकी एक निर्णय आपल्याला घ्यायचा आहे" असे जो बायडेन म्हणाले.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान बरोबर केलेला करार आपल्याला वारसामध्ये मिळाल्याचे त्यांनी सांगितले. "अमेरिकेच्या पुढच्या राष्ट्राध्यक्षाकडे हा विषय जाण्याऐवजी मी सध्या होणारी टीका सहन करीन" असे बायडेन म्हणाले. "२० वर्षानंतर अमेरिका लढत असलेले सर्वात मोठे युद्ध संपवण्याची ही वेळ आहे आणि देशासाठी हा योग्य निर्णय आहे" असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT