तापमानवाढीची मर्यादा ओलांडली जाणार? sakal
ग्लोबल

तापमानवाढीची मर्यादा ओलांडली जाणार?

‘आयपीसीसी’च्या अहवालात इशारा; परिस्थितीला मानवच कारणीभूत

सकाळ वृत्तसेवा

बर्लिन (पीटीआय) : पॅरिस (paris) पर्यावरण परिषदेत जागतिक नेत्यांनी तापमानवाढ रोखण्यासाठीची निश्‍चित केलेली दीड अंशांची कमाल मर्यादा येत्या दशकभरातच ओलांडली जाण्याची शक्यता आहे. पृथ्वीवरील तापमानमान वाढीचा एकूण वेग पाहता पर्यावरण बदलाबाबतच्या समितीने (IPC) आपल्या अहवालात याबाबत जाणीव करून दिली आहे. हा अहवाल म्हणजे मनुष्यासाठी ‘रेड अलर्ट’ असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. (Will the temperature rise be exceeded ipc Gesture)

पर्यावरण बदलाचा धोका कमी करण्यासाठी औद्योगीकरणपूर्व काळातील सरासरी जागतिक तापमानाच्या तुलनेत सध्याचे तापमान दोन अंशांपेक्षा अधिक वाढता कामा नये, असा शास्त्रज्ञांनी इशारा दिला होता. २०१५ ला झालेल्या पॅरिस पर्यावरण परिषदेत सर्व जागतिक नेत्यांनी एकत्र येत ही तापमानवाढ दीड अंशांपेक्षा अधिक जाऊ न देण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, ही मर्यादा आता येत्या काही वर्षांतच ओलांडली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांतील तापमानवाढ आणि पर्यावरणात घडून येणाऱ्या तीव्र बदलांचा अभ्यास करून पर्यावरण बदलावरील आंतरसरकार समितीने (आयपीसीसी) याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. सध्याच्या तापमानवाढीला मानवच कारणीभूत असल्याचेही या अहवालात स्पष्ट सांगितले आहे. पॅरिस करारावेळीच तापमान औद्योगिकीकरणपूर्व काळाच्या तुलनेत १.१ अंशांनी वाढलेले होते.

‘आयपीसीसी’चा हा तीन हजार पानी अहवाल जगभरातील २३४ शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. पर्यावरण बदलाचा वेग स्पष्ट करण्यासाठी अहवालात एक उदाहरण देण्यात आले आहे. पूर्वी ५० वर्षांतून एकदा येणारी उष्णतेची लाट आता दर दहा वर्षांनी येत आहे. तापमान आणखी एक अंशाने वाढल्यास अशा लाटा दर दोन वर्षांनी येऊ शकतात.

अहवालातील मुद्दे

  • पर्यावरण बदलाचा परिणाम तीव्र आणि जगात सर्वत्र

  • हा बदल आणखी तीव्र होण्याची शक्यता

  • समुद्राची पातळी वाढणे, हिमाच्छादन कमी होणे, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, पूर आणि वादळांची संख्या वाढत आहे

  • हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढले

उत्सर्जन कमी करण्यासाठीचे

  • भविष्यातील पाच टप्पे

  • प्रचंड प्रमाणात, तातडीने आणि सक्तीने उत्सर्जन घटविणे

  • मोठ्या प्रमाणात उत्सर्जन घटविणे

  • कार्बन प्रदूषण वाढतच जाणे

  • स्थानिक पातळीवर कमी प्रमाणात उत्सर्जन घटविणे

  • पुरेशा प्रमाणात उत्सर्जन घटविणे

(सध्या जग तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या मध्ये आहे)

पर्यावरण बदलाची परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. कोणतीही जागा सुरक्षित नसेल. तुम्ही कोठेही पळून जाऊ शकत नाही, लपून बसू शकत नाही.

- लिंडा मिआर्न्स, वरिष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: काटोलमध्ये शरद पवार पक्षाच्या अर्चना देशमुखांची विजयी आघाडी

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT