c-17 टि्वटर
ग्लोबल

मिशन AIRLIFT! काबुलहून IAF चे C-17 ग्लोबमास्टर भारताकडे रवाना

काबुलच्या धावपट्टीवर हजारोंचा जमाव जमला होता. काहीही करुन विमानात जागा मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती.

दीनानाथ परब

काबुल: अफगाणिस्तानातील काबुल विमानतळावरुन लष्करी विमानांची उड्डाण (Military flight) सुरु झाली आहेत. अफगाणिस्तानात तालिबान (Afganistan taliban) राज येणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हजारो अफगाणी नागरिक (Afgan national) काल काबूल विमानतळावर (Kabul airport) दाखल झाले. काबुलच्या धावपट्टीवर हजारोंचा जमाव जमला होता. काहीही करुन विमानात जागा मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती.

या गोंधळामध्ये विमानतळ परिसरात गोळीबाराच्याही घटना घडल्या. आता धावपट्टी रिकामी करण्यात आली असून तिथून विमानांची उड्डाण सुरु झाली आहेत. विविध देश अफगाणिस्तानात अडकलेले राजनैतिक अधिकारी आणि नागरिकांची सुटका करत आहेत. आज सकाळी इंडियन एअर फोर्सच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाने १२० भारतीयांना घेऊन काबुल विमानतळावरुन उड्डाण केले.

दुपारपर्यंत हे विमान मायदेशी दाखल होईल. C-17 ग्लोबमास्टरचे हे दुसरे उड्डाण आहे. १२० पेक्षा जास्त भारतीय अधिकारी या विमानामध्ये आहेत. काबुल विमानतळावरील सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेने घेतली असून अमेरिकन फौजांच्या देखरेखीखाली तिथे हवाई उड्डाण सुरु झाली आहेत. अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना काबूल येथे आणले जात आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती लक्षात घेऊन तिथले आपले राजदूत आणि सर्व कर्मचाऱ्यांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT