ग्लोबल

Taliban News : महिलांवरील निर्बंध तातडीने मागे घ्या!

सुरक्षा समितीचे तालिबानला आवाहन; मानवाधिकारांबाबत चिंता

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : अफगाणिस्तानमधील तालिबानी सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या देशातील महिला आणि मुलींवर शिक्षण आणि नोकरीबाबत लागू केलेल्या निर्बंधांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने आज चिंता व्यक्त केली.

मानवाधिकारांना पायदळी तुडविणारे हे निर्बंध तातडीने मागे घेतले जावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या समितीचे अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे. महिलांनी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन नये आणि बिगर सरकारी संस्थांमध्ये काम करू नये, असा आदेश तालिबानने गेल्या आठवड्यात काढला आहे. या आदेशावर जगभरातून टिका होत आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सत्ता ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने महिलांच्या अनेक अधिकारांवर गदा आणली आहे. अफगाणिस्तानमधील या परिस्थितीवर सुरक्षा समितीमध्ये आज चर्चा झाली. भारतातर्फे अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसलेल्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत अफगाणिस्तानमधील महिलांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली.

‘महिला आणि मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे, ही चिंतेची बाब आहे. महिलांना त्यांचे अधिकार आणि हक्क पूर्णपणे मिळणे आवश्‍यक आहे. तालिबानने महिला आणि मुलींसाठी शाळा आणि महाविद्यालये पुन्हा खुली करावीत. तालिबानच्या विविध आदेशांमुळे मानवाधिकारांचा भंग होत आहे.,’ असे या निवेदनात म्हटले आहे.

देशातील महिलांना बिगर सरकारी संस्थांमध्ये, विशेषत: विदेशी संस्थांमध्ये काम करण्यास मनाई करणाऱ्या आदेशावरही सुरक्षा समितीने टीका केली आहे. तालिबानच्या या आदेशामुळे येथे काम करणाऱ्या अनेक मानवतावादी संघटनांच्या कामावर परिणाम झाला आहे. या संघटनांमार्फत अफगाणिस्तानमधील गरजूंना अन्नधान्य, वस्तू आणि औषधे यांचा पुरवठा केला जातो. ही मदत जवळपास ठप्प झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT