diamond 
ग्लोबल

युट्युबवर शोधताना तिला खरंच सापडला हिरा

वृत्तसंस्था

टेक्‍सास : येथील एक महिला युट्युबवर "हिरा कसा शोधावा' असे सर्च करत होती. मात्र, ज्याठिकाणी बसून ती हा शोध घेत होती तिथेच तिला 3.72 कॅरेटचा पिवळा हिरा सापडला. मिरांडा हॉलिंग्सहेड असे या तरूणीचे नाव असून ती कुटुंबियांसोबत दक्षिण अमेरिकेतील आर्कनसॉ येथील क्रेटर ऑफ डायमंड पार्कमध्ये पर्यटनाला गेली होती. पार्कमध्ये फिरत असताना थोडीशी विश्रांती म्हणून ती एका ठिकाणी बसली आणि सहजपणे युट्युब बघू लागली. त्यावर तिने पार्कमध्ये "हिरा कसा शोधावा', याबाबत सर्च केले. आश्‍चर्य म्हणजे ज्याठिकाणी ती बसली होती, तेथून जवळच तिला चक्क हिरा सापडला. 

क्रेटर ऑफ डायमंड पार्कमध्ये पर्यटकांना 37.5 एकर क्षेत्रामध्ये हिरे शोधण्यासाठी परवानगी दिली जाते. याठिकाणी आलेले पर्यटक मिळेल तेवढा वेळ हिरे शोधतात, मात्र अनेकदा त्यांच्या नशिबी निराशाच येते. अशाच प्रकारे पर्यटनाला आलेल्या मिरांडाला या पार्कमध्ये एका दगडाला चिकटलेला हिरा सापडला. हिरा सापडताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. एका खोडरबराच्या आकाराचा असलेला हा हिरा घेऊन ती डायमंड पार्कच्या अधिकाऱ्यांकडे गेली आणि हिऱ्याबाबत खात्री करून घेतली. 

मार्च 2017 नंतर पार्कमध्ये सापडलेला हा सर्वात मोठ्या आकाराचा हिरा असून यापूर्वी एका लहान मुलाला 7.44 कॅरेटचा हिरा सापडला होता. महिन्याभरापूर्वी एका शिक्षकाला 2.12 कॅरेटचा हिरा सापडला होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Kaygaon News : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अमळनेर येथे ‘आजी-आजोबा दिन’ उत्साहात साजरा

Velhe News : गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनाला शासनाची मान्यता; वाजेघर, वांगणी व शिवगंगा खोऱ्यातील सिंचनाला मिळणार गती

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

SCROLL FOR NEXT