women protest on us supreme court ends constitutional right to abortion  sakal
ग्लोबल

गर्भपाताचा अधिकार : अमेरिकेत महिला रस्त्यांवर उतरल्या

कोर्टाच्या आदेशाला विरोध, अनेक रुग्णालयांनाही टाळे

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने महिलांचा गर्भपाताचा घटनात्मक अधिकार काढून घेतल्यानंतर आज अनेक शहरांमध्ये महिला रस्त्यांवर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. वॉशिंग्टनमध्येही महिलांनी आज जोरदार आंदोलन केले. अमेरिकेतील तब्बल पन्नास शहरांमध्ये आंदोलनाचा हा वणवा भडकला आहे. अमेरिकेतील जनमत हे गर्भपाताला कायदेशीर परवानगी द्यावी याच बाजूने असल्याचे दिसून येते. या निकालानंतर तेथील अनेक रुग्णालयांनी ताळे ठोकायला सुरूवात केली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर तेथील अर्ध्यापेक्षा जास्त राज्ये गर्भपातावर नवे निर्बंध घालण्याच्या तयारीत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तब्बल पन्नास वर्षांपूर्वीच्या रोव्ह विरुद्ध वेड या खटल्यामध्ये दिलेला ऐतिहासिक निकाल बाजूला ठेवतानाच महिलांचा गर्भपाताचा घटनात्मक अधिकार काढून घेतला होता. न्यायालयाच्या या निकालावर राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अमेरिेकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हा निकाल म्हणजे एक दुर्दैवी चूक असल्याचे म्हटले आहे. या निकालाविरोधात अमेरिकेमध्ये आज ठिकठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले. फिनिक्स राज्यातील अॅरिझोना येथे आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. लॉस एंजेलिसमध्येही आंदोलकांनी रस्त्यांवरील वाहतूक रोखून धरली होती.

रुग्णालये संकटात

अमेरिकेमध्ये सुरक्षित गर्भपात करणारी अनेक रुग्णालये होती, आता त्या सगळ्यांचाच व्यवसाय या निकालामुळे संकटात येणार आहे. ज्या महिलांनी गर्भपात करण्यासाठी आधीच रुग्णालयातून परवानगी घेतली होती, त्यांची नोंदणी देखील रुग्णालयाकडून रद्द करण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रेही नाराज

अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार समितीने नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाचा हा निकाल म्हणजे मानवी हक्क आणि लिंग समानतेला मोठा धक्का असून या निकालामुळे गर्भपात करू पाहणाऱ्या लोकांना रोखता येणार नाही, त्यामुळेच ही प्रक्रिया अधिक जीवघेणी ठरेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT