Work From Home Sakal
ग्लोबल

आता वर्क फ्रॉम होमसाठी 'या' देशात कायदा; लाखो भारतीयांना होणार फायदा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - अडीच वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीमुळे जागतिक स्तरावरील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From home) अर्थात घरून काम करण्याची सूट दिली होती. कर्मचारी देखील घरी राहून चांगल्या पद्धतीने काम करतात. हे लक्षात आल्यानंतर अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम कायम ठेवलं. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालात येण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र नेदर्लंडमध्ये वर्क फ्रॉम होमसाठी कायदा करण्यात आला आहे. (Work From home news in Marathi)

नेदरलँडमध्ये घरातून काम किंवा रिमोट वर्क या संकल्पनेचा कायदेशीर अधिकाराच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे. डच संसदेने याला मंजुरी दिली असून, लवकरच डच सिनेटमध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

नेदरलँडमधील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची कोणतीही सक्ती राहणार नाही, ते त्यांच्या घरी किंवा इतरत्र कुठेही बसून त्यांचे कार्यालयीन कामकाज सुरळीत करू शकतील. कार्यालयातील कोणतेही काम न येता पूर्ण करता येत असल्यास घरून काम करण्याची कर्मचाऱ्याची विनंती कोणतीही कंपनी नाकारू शकणार नाही. मात्र, ज्या जबाबदाऱ्यांसाठी कार्यालयात आल्याशिवाय पार पडू शकत नाही, त्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची सक्ती केली जाईल.

नेदरलँडमधील एका आयटी कंपनीत काम करणारी रोशनी मुरली सांगितलं की, यूकेनंतर नेदरलँड्समधील कंपन्यांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. नेदरलँडमध्ये सुमारे 2.40 लाख अनिवासी भारतीय/ भारतीय वंशाचे लोक राहतात. या सर्वांना या कायद्याचा लाभ होणार आहे. अशाच प्रकारची कायदेशीर व्यवस्था भारतात लागू केल्यास ती कोरोना आणि प्रदूषण नियंत्रण या दोन्ही बाबतीत प्रभावी ठरेल, असे रोशनीचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT