world bicycle day world bicycle day
ग्लोबल

World Bicycle Day: असाही एक देश जिथं पंतप्रधान जातात सायकलीवरून संसदेत

पर्यावरणचे महत्त्व जसं जसं लोकांना पटू लागलं तसं शहरातही सायकलींच्या वापराचा ट्रेंड काही प्रमाणात दिसत आहे

प्रमोद सरवळे

नवी दिल्ली: सध्याच्या काळात भारतात रस्त्यावर सायकल चालवणे मोठं जिकिरीचं झालं आहे. तसं पाहायला गेलं तर शहरांसोबतच ग्रामीण भागात सायकलींच्या वापरात कमालीची घट झाली आहे. पण देशातील काही खेड्यांमध्ये सायकलीचा वापर रोजरोसपणे सुरू आहे. पर्यावरणचे महत्त्व जसं-जसं लोकांना पटू लागलं तसं शहरातही सायकलींच्या वापराचा ट्रेंड काही प्रमाणात दिसत आहे. सायकलच्या वापराने व्यायामही होत असल्याने त्याचा चांगल्या आरोग्यासाठी मोठा फायदा होतो. आज ३ जून जागतिक सायकल दिन (world bicycle day) म्हणून साजरी केला जातो.

एका बाजूला जरी बाजारात नवनवीन वाहने उपलब्ध होत असताना जगात असाही एक देश आहे जिथं सायकलींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. रस्त्यावर पहिला अधिकार सायकलस्वारांचा आहे. महत्त्वाचे म्हणजे तिथले पंतप्रधानसुद्धा ऑफिसला सायकलीवरच जातात. युरोपमधील नेदरलँडमध्ये मोठ्या प्रमाणात सायकलींचा वापर केला जातो. ॲम्स्टरडॅममध्ये बरेच जण जवळच्या प्रवासासाठी सायकलीला पसंदी देतात. इथं सायकली एवढ्या प्रसिद्ध आहेत की इथले पंतप्रधान मार्क रुटदेखील (Mark Rutte) सायकलीवरून संसदेत आणि ऑफिसला जातात.

world bicycle day

ॲम्स्टरडॅममध्ये सायकलींसाठी विशेष रस्त्यांचे नेटवर्क आहे. तसेच मोठ्या रस्त्यांच्या शेजारून सायकलींसाठीही ट्र्रॅक ठेवले आहेत. त्यामुळे वयस्करांपासून लहान मुलेही इथं सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सायकलींवरून करतात. सायकलीवरून प्रवास फक्त ॲम्स्टरडॅममध्ये नसून तो इतरही डच शहरांत प्रसिद्ध आहे. डच लोक सायकल चालवण्याचा मोठा आनंद घेतात. वाढत्या औद्योगिकीकरणासोबत सायकल वापराचे प्रमाण संपेल असं वाटत होतं पण या देशाचा अपवाद मोठा अपवाद दिसून येतो.

२० व्या शतकाच्या सुरुवातीला, नेदरलँडमध्ये सायकलींचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. या काळात सायकल पुरुषांसोबत, महिलांसाठी बेस्ट सवारी मानली जात होती. पण जेंव्हा दोन महायुद्धानंतर नेदरलँडची अर्थव्यवस्था तेजीत आली तेंव्हा तिथं कारच्या वापरांचे प्रमाण वाढले. कार आणि मोठ्या वाहनांचा वापर वाढल्यानंतर रस्त्यांसाठी ॲम्स्टरडॅममध्ये शहरात मोठे बदल केले गेले. सायकलींचा वापर प्रतिवर्ष ६ टक्क्यांनी कमी होत गेला. असं वाटत होतं की सायकलींचा वापर पुर्णतः थांबेल पण असं झालं नाही.

world bicycle day 2021

वाढत्या ट्रॅफिकमुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले होते. १९७१ मध्ये रस्त्यावरील अपघातात तब्बल ३ हजार ३०० लोकांचा मृत्यू झाला होता, यामध्ये ४०० बालकांचा समावेश होता. नंतर वाढत्या अपघातांमुळे नागरिकांनी आंदोलन केले होते. "स्टॉप दी किंडर्मोर्ड" (बालहत्या थांबवा) अशी घोषणा या आंदोलनादरम्यान केली गेली. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात सायकलींचा वापर झाला होता. या आंदोलनात तरुण, लहान मुले आणि वृद्धांची मोठी संख्या होती. आंदोलनादरम्यान गाणी म्हटली जात होती. घरातील सगळी कामे रस्त्यावर येऊन केली जात होती. काही लोकांनी तर घरातील डायनिंग टेबलदेखील रस्त्यावर आणले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT