जीनिव्हा (स्वित्झर्लंड) - कोरोनावरील लसीच्या निर्यातीवरील निर्बंधांमुळे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) युरोपीय महासंघाला फटकारले आहे. अशा उपायांचा अवलंब केल्यास जागतिक साथीचे निर्मुलन करण्यास विलंब होईल असा इशाराही देण्यात आला.
गरीब देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण फार कमी आहे. त्यातच महासंघाच्या सदस्य देशांत उत्पादन झालेले डोस इतर देशांत पाठविले जाणार नाहीत अशी भूमिका युरोपीय महासंघाने घेतली आहे. लसीच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाल्यामुळे हा उपाय अवलंबण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर डब्लूएचओच्या उपाध्यक्षा मारीयांजेला सिमाओ यांनी सांगितले की, हा पायंडा अत्यंत चिंताजनक आहे.
दावोसमधील ऑनलाइन परिषदेत डब्लूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस यांनी सांगितले की, लसीचा साठा करण्यामुळे जागतिक संसर्ग वाढत राहील आणि आर्थिक संकटातून सावरण्याची प्रक्रिया संथ बनेल. त्यामुळे नैतिक पातळीवरील अपयशाच्या रूपाने महासंकट ओढवेल.
शंभर देशांना फटका
युरोपीय महासंघाच्या उपायांमुळे जगभरातील शंभर देशांना लस मिळण्यात फटका बसेल. यात ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या प्रमुख देशांचा समावेश आहे.
घेब्रेयेसूस यांचा इशारा
डब्लूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस यांनी काही महिन्यांपूर्वीच लसीकरणातील राष्ट्रीयवादामुळे कोरोनाच्या जागतिक साथीतून जग सावरण्याचा कालावधी लांबेल असा इशारा दिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.