World Trade Organization G-33 countries should come together Piyush Goyal
World Trade Organization G-33 countries should come together Piyush Goyal  Piyush Goyal
ग्लोबल

‘जी-३३’ देशांनी एकत्र यावे, व्यापारासाठी पियूष गोयल यांचा नवा 'प्लॅन'

सकाळ वृत्तसेवा

जीनिव्हा : जागतिक व्यापार संघटनेकडून विकास केंद्रीत, सर्वांना समान न्याय देणारे आणि समतोल धोरण राबविले जावे, यासाठी जी-३३ गटातील विकसनशील देशांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मंत्रिस्तरावरील परिषदेसाठी येथे आलेल्या गोयल यांनी त्यापूर्वी आयोजित केलेल्या बैठकीत ही भूमिका मांडली.

गोयल म्हणाले,‘‘विकसीत देश काही उत्पादनांना मोठ्या प्रमाणात अंशदान देत असल्याने विकसनशील देशांमध्ये आयातीचे प्रमाण प्रचंड वाढते आणि त्यामुळे देशांतर्गत उत्पादनांचे नुकसान होते. या उत्पादनांचे संरक्षण करण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी, अशी जी-३३ गटाची मागणी आहे. भारत सर्व पातळीवर या यंत्रणेसाठी प्रयत्न करत आहे. या यंत्रणेमुळे गरीब देशांच्या हितांचे रक्षण होणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT