Salman Rashdie Sakal
ग्लोबल

Salman Rushdie: चाकू हल्ल्यानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

प्राणघातक हल्ल्यानंतर रश्दी सध्या व्हेंटिलेटरवर असून हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Salman Rushdie Attack: भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर काल रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली असून सध्या ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती हाती येत आहे. दरम्यान, न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या हल्ल्यावर अमेरिकेकडून (United States of America) पहिली प्रतिक्रिया आली आहे.

सलमान रश्दी यांच्यावर झालेला हल्ला भयावह आहे. आम्ही सर्व ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहोत. आणि त्यांना तात्काळ मदत केल्याबद्दल आम्ही चांगल्या नागरिकांचे आभारी आहोत अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे व्हाईट हाऊसचे (White house) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी दिली आहे.

कसा झाला हल्ला?

एका कार्यक्रमासाठी रश्दी निघाले होते. त्यावेळी अचानक एका व्यक्तीने समोरून धावत येत त्यांच्यावर चाकूने वार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर रश्दी (Salman Rushdie) खाली कोसळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. त्यांच्या लिखाणामुळे रश्दी अनेकदा वादात अडकले आहे. त्यांना अनेकदा धमक्याही आल्या होत्या. त्यामुळे त्यांना सुरक्षाही देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT