Maria Van Kerkhove sakal
ग्लोबल

वुहान लॅबची पुन्हा होणार झाडाझडती; WHO शोधणार कोरोनाचं मूळ

चीनमध्ये पुन्हा होणार कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीची तपासणी

राहुल शेळके

चीन : कोरोना विषाणू कुठून आणि कसा पसरला हे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने 26 तज्ञांचा ग्रुप बनवला आहे. हा ग्रुप चीनमध्ये कोरोना विषाणूच्या पसरण्याचे मुळं शोधण्याचे काम करेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका गटाने या वर्षाच्या सुरुवातीलाच चीनच्या वुहान शहरामध्ये चार आठवडे राहुन संशोधन केले होते मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुचे मुळं शोधण्याचा हा शेवटचा प्रेयत्न असेल असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे त्यासाठी सुरवातीला कोरोना झालेल्या लोकांचा डेटा उपलब्ध करून द्यावा असं चीनला सांगण्यात आलं आहे.

चीनच्या वुहान शहरातील सन 2019 च्या माहितीवर आरोग्य संघटनेचा भर

जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल टीमच्या प्रमुख मारिया वेन केरखोव यांनी चीन जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमला मदत करेल अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच कोरोना विषाणु जनावरां मधून माणसांमध्ये कसा प्रसारित झाला याचा शोध घेण्यासाठी जगभरातील 36 प्रस्तावित अभ्यासांचा आधार घेतला जाणार आहे. सन 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरातील लोकांच्या अँटीबॉडीस टेस्टचा डेटा हा महत्वाचा आहे यातून कोरोना विषाणूचा उदय कसा झाला याची माहिती मिळण्यास मदत होईल.

संशोधनासाठी जागतिक आरोग्य संघटनेला वुहान लॅबमध्ये साठवलेल्या रक्ताच्या नमुन्यांचा तपशील हवा

एका विज्ञान पत्रिकेच्या संपादकीयमध्ये WHO ने आधीच सांगितले आहे की डिसेंबर 2019 पूर्वी चीनमध्ये कोरोनाच्या संशयित प्रकरणांची आणि पुष्टी झालेल्या प्रकरणांची तपशीलवार चौकशी करण्याची गरज आहे. यासाठी, 2019 पासून, वुहान लॅबमध्ये साठवलेल्या रक्ताचे नमुने आणि रुग्णालयांमध्ये मृत्यूच्या डेटाचे विश्लेषण केले पाहिजे. आरोग्य संघटनेने असेही म्हटले आहे की वुहानच्या परिसरात जिथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, तेथील प्रयोगशाळांची तपासणी केली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

Petrol Diesel Rates update : पेट्रोल -डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

खऱ्या आयुष्यातही सगळ्यांशी तुसडेपणाने वागतो समीर परांजपे; बायकोचा खुलासा, म्हणाली, 'आताची भूमिका सेम टू सेम'

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT