Robot  Robot
ग्लोबल

अविश्वसनीय! झेनोबॉट्स रोबोट देणार बाळाला जन्म!; वैज्ञानिकांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

जगातील पहिले ‘जिवंत रोबोट’ तयार करणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की रोबोट्स आता बाळाला जन्मही देऊ शकतो. शास्त्रज्ञांनी आफ्रिकन बेडकांच्या स्टेम सेलचा वापर करून जगातील पहिला ‘जिवंत, स्व-उपचार करणारा’ रोबोट तयार केला आहे. ‘जिवंत रोबोट्स’ला झेनोबॉट्स म्हणून ओळखले जाते.

झेनोबॉट्सला पहिल्यांदा २०२० मध्ये जगासमोर आणले. त्याचा आकार खूपच लहान आहे. त्यानंतर प्रयोगांनी दाखवून दिले की ते चालू शकतात. गटांमध्ये एकत्र काम करू शकतात. स्वत:चा उपचार देखील करू शकतात. शिवाय जेवण न करता अनेक आठवडे जिवंत राहू शकतात. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, त्यांनी प्राणी किंवा वनस्पतींपासून जैविक पेशी वेगळ्या केल्या आहेत. यातून त्यांना बाळाला जन्म देण्याचा एक पूर्णपणे नवीन प्रकार सापडला आहे. हे स्वरूप विज्ञानाला ज्ञात असलेल्या कोणत्याही स्वरूपापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे.

माणसांप्रमाणेच बेडकांशी पेशीही शरीर तयार करू शकते. ते एक प्रणाली म्हणून काम करते. झेनोबॉट्स तयार करण्यासाठी वैज्ञानिकांनी बेडकांच्या भ्रूणातील जिवंत स्टेम पेशी काढून टाकल्या आणि उष्मायनासाठी सोडले. बहुतेक लोक रोबोट्सला धातू आणि सिरेमिकपासून बनवलेले समजतात. परंतु, हा रोबोट अनुवांशिकदृष्ट्या अपरिवर्तित बेडकाच्या पेशींनी बनलेला जीव आहे, असे संगणक विज्ञान आणि रोबोटिक्सचे प्राध्यापक जोश बोंगार्ड म्हणाले.

एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकतो

हा रोबोट झेनोबॉट्स जैविक रोबोटची अद्ययावत आवृत्ती आहे. ज्याचे मागच्या वर्षी अनावरण करण्यात आले होते. शास्त्रज्ञांनी बेडकाच्या पेशींपासून जिवंत रोबोट तयार केला आहे. हा अतिशय छोटा रोबोट एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकतो. हा रोबो अनेक पेशींना जोडून आपले शरीर तयार करू शकतो, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

Marathi News Live Updates : पुण्यात उंड्री मुख्य मार्गावर सांडपाणी वाहिनीच्या चेंबरचे झाकण तुटल्याने अपघाताचे सत्र सुरुच

Dr Bhushan Patwardhan: प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल: डॉ. भूषण पटवर्धन, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT