Pakistan Cabinet eSakal
ग्लोबल

Pakistan Cabinet : दहशतवादी यासिन मलिकची पत्नी झाली पाकिस्तानच्या पंतप्रधानांची विशेष सल्लागार; नव्या कॅबिनेटने घेतली शपथ

Yasin Malik Wife : 'काश्मीर हा पूर्णपणे पाकिस्तानचा आहे, आणि आम्ही तो घेऊनच राहू' असं ती म्हणाली होती.

Sudesh

दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवार-उल-हक कक्कड यांनी गुरुवारी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. यामध्ये कुख्यात दहशतवादी यासिन मलिकच्या पत्नीचाही सहभाग होता.

पाकिस्तानातील टीव्ही चॅनल जियो न्यूजने याबाबतची माहिती दिली. यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसैन ही पंतप्रधानांची विशेष सल्लागार म्हणून काम करणार आहे. तिच्यासोबत आणखी चार जणांना विशेष सल्लागार म्हणून नेमलं आहे.

कसं आहे मंत्रिमंडळ?

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत जलील अब्बास जिलानी यांना परराष्ट्र मंत्रीपद मिळालं आहे. तर माजी केंद्रीय बँक प्रमुख शमशाद अख्तर यांना अर्थमंत्री करण्यात आलं आहे. गुरुवारी एकूण 16 मंत्री आणि तीन सल्लागारांचा शपथविधी पार पडला. मंत्रिमंडळात वरिष्ठ पत्रकार मुर्तजा सोलंगी यांनाही संधी देण्यात आली आहे.

भारताची कट्टर विरोधक मुशाल

मुशाल हुसैन ही भारताविरोधी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या काश्मीर फाईल्स चित्रपटानंतरही तिने असंच विधान केलं होतं. 'काश्मीर हा पूर्णपणे पाकिस्तानचा आहे, आणि आम्ही तो घेऊनच राहू' असं ती म्हणाली होती. सोबतच, यासिन मलिकला तुरुंगातून सोडवण्यासाठी मुशाल पाकिस्तानात मोहीमही चालवत आहे.

कोण आहे यासिन मलिक?

यासिन मलिक हा काश्मिरी दहशतवादी आहे. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेचा तो नेता आहे. टेरर फंडिंग, दहशतवाद पसरवणे, तरुणांना भडकावणे आणि एअरफोर्सच्या जवानांवर हल्ला करणे असे कित्येक आरोप यासिनवर आहेत.

यासोबतच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीच्या अपहरणाचा आरोपही यासिनवर आहे. त्याला दोन प्रकरणांमध्ये जन्मठेप आणि आणखी काही प्रकरणांमध्ये 10 वर्षे कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या तो भारतात तुरुंगात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rave Party Raid : पुण्यात कथित हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर मध्यरात्री छापा, रिसॉर्टमधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update : मान्सूनचा विमानसेवेवर परिणाम; सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद उड्डाणे ऑगस्टपर्यंत स्थगित

Pimpri: लग्न जमविण्याच्या नावाखाली घातला जातोय गंडा; विवाहेच्छूंनो सावधान; बनावट प्रोफाइलद्वारे फसवणुकीचे वाढते प्रकार

Obesity Crisis in Maharashtra: महाराष्ट्रात स्थूलतेचा झपाट्याने वाढता धोका; १० पैकी ४ महिला जादा वजनाच्या, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा इशारा

Pune: पाच हजार नागरिकांचे घराचे स्वप्न प्रतीक्षेत; दहा हजारांपेक्षा जास्त अर्ज; घरांची संख्या मर्यादितच

SCROLL FOR NEXT