pm narendra modi  esakal
ग्लोबल

Yoga Day 2023 : यूएनच्या मुख्य कार्यालयाबाहेर मोदींच्या उपस्थितीत योगा दिन साजरा; मोदी म्हणाले...

संतोष कानडे

नवी दिल्लीः आज जागतिक योगा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थतीत यूएनच्या मुख्य कार्यालयाबाहेर योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा दिनाचं महत्त्व उपस्थितांना विषद केलं.

यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, योगा म्हणजे एकजुट होणं आहे. यौगामुळे शरीर, मन निरोगी राहण्यास मदत होते. हे एक मोठं शास्त्र जगाला मिळालेलं आहे. योगसाधना ही भारताची अत्यंत जुनी परंपरा आहे. त्यामुळे ९ वर्षांपूर्वी आम्ही योगा दिन साजरा करण्यास सुरुवात केली. योगा हा जीवन जगण्याचा समृद्ध मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

यावेळी यूएन सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वांनी आपपली मतं व्यक्त केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी यूएनचे आभार मानले. यावेळी योगाची काही प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. अमेरिकेमध्ये ३ कोटी लोक दररोज योगा करतात, असं यावेळी सांगण्यात आलं.

९ वर्षांपूर्वी योगा डे सुरु केल्यापासून जगभरात दररोज ३० कोटी लोक योगा करतात. १० कोटी लोक एकट्या भारतात योगा करतात. यावरुन दिवसेंदिवस योगा कल्चर वाढत असल्याचं दिसून येत आहे. यूएनच्या मुख्य कार्यालयाबाहेर योगा डे साजरा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT