You will never see children again He sent a message to his wife 
ग्लोबल

'तू मुलांना पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीस'; त्याने पत्नीला मेसेज पाठवला अन्...

वृत्तसंस्था

रोम- पित्याने आपल्या दोन लहान जुळ्या मुलांचा जीव घेऊन स्व:ता आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर इटलीमधील ही घटना आहे. विशेष म्हणजे पित्याने काही तासांपूर्वीच मुलांसोबत हसतानाचा सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या पत्नीला 'तू मुलांना पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीस' असा मेसेज केला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

3 वर्षाच्या चिमुकल्याला जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबारातून वाचवलं; व्हिडिओ...
45 वर्षीय मारीओ ब्रेसी आपली जुळी मुलं डिएगो आणि इलेना यांना घेऊन सुट्टीसाठी गेला होता. यावेळी ब्रेसीने मुलांसोबत मिळून सुट्टीचा आनंद घेतला. त्यांच्यासोबत फोटोही काढले. तसेच एक सेल्फी त्याने  इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. पोस्टला त्याने 'विथ माय चिल्ड्रन, अलवेज टुगेदर' असं कॅप्शन दिलं होतं. हा ब्रेसीचा आणि त्याच्या मुलांचा शेवटचा सेल्फी ठरला आहे. रात्री मुलं झोपी गेल्यानंतर ब्रेसीने थंड डोक्याने या दोन्ही मुलांना मारुन टाकले आहे. त्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केली आहे.

मुलांना मारताना त्यांनी आपल्या डोळ्यात पाहू नये यासाठी ब्रेसीने रात्रीची वेळ निवडली होती. डिएगोला त्याने गळा दाबून मारले, तर इलेना याला त्याने उशी तोंडावर दाबून मारले आहे. त्यानंतर ब्रेसीने ब्रिजवरुन उडी खात स्वत:चा जीव दिला आहे. धक्कादायक म्हणजे त्याने आत्महत्येपूर्वी त्याची पत्नी आणि मुलांची आई डॅनियला हिला  'तू मुलांना पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीस, तू आपल्या कुटुंबाला उद्धवस्त केलंस' असा मेसेज केला होता. मेसेज मिळताच डॅनियल घराकडे धावली, तेव्हा तिला दोन्ही मुले मेलेल्या अवस्थेत आढळली. हा सर्व प्रकार पाहून तिला धक्काच बसला. तिने तात्काळ याबाबत पोलिसांना कळवलं 

रेल्वेमध्ये खाजगीकरण! केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल
दरम्यान, ब्रेसी आणि डॅनियल गेल्या दोन वर्षांपासून वैवाहिक समस्येमधून जात होते. मात्र, ब्रेसीने कधीही हिंसक वर्तन दाखवले नाही, असं डॅनियल हिने सांगितलं आहे. इटालीयन पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. ब्रेसीने असे टोकाचे पाउल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले याबाबत पोलिस शोध घेत आहे. ब्रेसीचा मृतदेह सापडला असला तरी त्याचा मोबाईल पोलिसांना अजून सापडलेला नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

Truck Eicher Accident : भरधाव ट्रकची आशरला पाठीमागून धडक; भिषण अपघातात दोघांचा मृत्यू, ८ शेळ्या दगावल्या

फक्त ३३ किमी रुंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे कशी जातात?

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT